विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली आहे. विनेश फोगटची घोषणा साक्षी मलिकने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आणि बजरंग पुनियाने पद्मश्री परत केल्याच्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीनंतर आली आहे.Wrestler Vinesh Phogat announced to return Khel Ratna and Arjuna awards
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगटचाही समावेश होता. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांसारख्या अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. बजरंग पुनियासह या कुस्तीपटू त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आघाडीवर होते.
ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गुरुवारी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद संजय सिंहने जिंकल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर बजरंग पुनियाने आपले पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रविवारी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला निलंबित केले होते.
पदक परत करण्यासोबतच विनेश फोगटने सोशल मीडियावर तिचे मतही शेअर केले आहे. विनेशने लिहिले, “साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपले पद्मश्री परत केले आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करण्यास का भाग पाडले जाते? हे संपूर्ण देशाला हे माहित असले पाहिजे. असे तिने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App