चिंताजनक : कोरोना काळात १ लाख ४७ हजार मुलांनी गमावले पालक, निराधार मुलांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, NCPCRचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात

Worrying 1 lakh 47 thousand children lost parents during Corona period, NCPCR report in Supreme Court

NCPCR report in Supreme Court : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सर्वोच्च न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे. आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात देशातील 1 लाख 47 हजार 492 मुलांनी त्यांचे आई, वडील किंवा दोघेही गमावले आहेत. एनसीपीसीआरच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत अनाथ मुलांच्या पालकांपैकी बहुतेकांना कोरोनाव्हायरस किंवा इतर कोणत्याही घटनेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. Worrying 1 lakh 47 thousand children lost parents during Corona period, NCPCR report in Supreme Court


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सर्वोच्च न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे. आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात देशातील 1 लाख 47 हजार 492 मुलांनी त्यांचे आई, वडील किंवा दोघेही गमावले आहेत. एनसीपीसीआरच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत अनाथ मुलांच्या पालकांपैकी बहुतेकांना कोरोनाव्हायरस किंवा इतर कोणत्याही घटनेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

एनसीपीसीआरने ही माहिती सुओमोटोशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला दिली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने आयोगाला विचारले होते की, कोरोना महामारीदरम्यान आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या किती आहे? याबाबत एनसीपीसीआरने ही आकडेवारी न्यायालयाकडे सुपूर्द केली. आयोगाने असेही म्हटले आहे की, त्यांचा डेटा 11 जानेवारी 2021 पर्यंतचा आहे आणि ‘बाल स्वराज पोर्टल – कोविड केअर’ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रदान केलेल्या डेटाच्या आधारे तो गोळा केला गेला आहे.

NCPCR नुसार, 11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की एप्रिल 2020 पासून आतापर्यंत देशात आई-वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांची संख्या 10 हजार 94 इतकी होती, तर पालकांपैकी एकाला गमावलेल्या मुलांची संख्या 1 लाख 36 हजार 910 होती. याशिवाय सोडून दिलेल्या मुलांची संख्या ४८८ झाली आहे. ही सर्व आकडेवारी जोडली तर देशात आई-वडील गमावणाऱ्या मुलांची संख्या १ लाख ४७ हजार ४९२ वर पोहोचली आहे.

कोणत्या वयात, पालकांनी किती मुले गमावली?

पालक गमावलेल्या मुलांमध्ये 76 हजार 508 मुले, 70 हजार 980 मुली, तर चार ट्रान्सजेंडर मुलांचाही यामध्ये समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, साथीच्या काळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या मुलांमध्ये ८ ते १३ वयोगटातील ५९,०१० मुले, १४-१५ वयोगटातील २२ हजार ७६३, 16-18 वर्षे वयोगटातील २२,६२६ बालकांचा समावेश होता. याशिवाय चार ते सात वयोगटातील 26,080 मुलांनी, आई किंवा वडील किंवा दोघेही या काळात गमावले.

सर्वाधिक निराधार मुले कोणत्या राज्यांत?

एप्रिल 2020 पासून कोविड आणि इतर कारणांमुळे ज्या मुलांनी आपले पालक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत त्यांचा राज्यवार तपशील देताना आयोगाने सांगितले की, अशा मुलांची सर्वाधिक संख्या ओडिशातील आहे (24,405). त्यापाठोपाठ महाराष्ट्र (19,623), गुजरात (14,770), तामिळनाडू (11,014), उत्तर प्रदेश (9,247), आंध्र प्रदेश (8,760), मध्य प्रदेश (7,340), पश्चिम बंगाल (6,835), दिल्ली (6,629) आणि राजस्थानचा (6,827) क्रमांक लागतो.

एनसीपीसीआरनेही मुलांच्या निवारागृहाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. यानुसार, सर्वाधिक मुले (1,25,205) आई किंवा वडिलांकडे आहेत, तर 11,272 मुले कुटुंबातील सदस्यांसह आहेत आणि 8,450 मुले पालकांकडे आहेत. 1,529 मुले बालगृहात, 19 खुल्या निवारागृहात, दोन निरीक्षण गृहात, 188 अनाथाश्रमात, 66 विशेष दत्तक संस्थांमध्ये आणि 39 वसतिगृहात असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील SCPCR सह प्रदेशनिहाय बैठका घेत आहेत आणि 19 जानेवारी रोजी उत्तर-पूर्व राज्यांसह आभासी बैठक होणार आहे.

Worrying 1 lakh 47 thousand children lost parents during Corona period, NCPCR report in Supreme Court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात