Punjab Elections : पंजाबमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग चन्नी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत चन्नी यांच्या भावाचे नाव नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. Punjab Elections Punjab CM Charanjit Singh Channy’s brother calls for rebellion, announces to contest independent against Congress candidate
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग चन्नी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत चन्नी यांच्या भावाचे नाव नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
मनोहर सिंग चन्नी यांनी माध्यमांना सांगितले की, ते बस्सी पठाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षप्रमुखांनी तिकीट मिळू दिले नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भावानेही कॅबिनेट मंत्री गुरकीरत कोटली यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. चन्नी यांचे बंधू त्यांच्या भागात प्रचार करत आहेत.
यापूर्वी 11 जानेवारी रोजी चरणजीत सिंग चन्नी यांचे चुलत भाऊ जसविंदर सिंग धालीवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंजाबचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Punjab Elections Punjab CM Charanjit Singh Channy’s brother calls for rebellion, announces to contest independent against Congress candidate
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more