काँग्रेस आणि भाजपचे काही नेते दबक्या आवाजात सांगत आहेत की ..
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : Navjot Singh Sidhu रोड रेज प्रकरणी तुरुंगातून सुटल्यानंतर राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ.नवज्योत कौर यांनी भाजप नेते तरनजीत सिंग संधू यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. डॉ.नवज्योत कौर यांनी तरनजीत सिंग संधू यांची त्यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सिद्धू दाम्पत्याची मुलगी राबिया सिद्धूही त्यांच्यासोबत होती.Navjot Singh Sidhu
तरनजीत सिंग संधू यांनी हे छायाचित्र इंटरनेट मीडियावर अपलोड करताच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या. संधू यांनी लिहिले, ‘डॉ. नवज्योत यांना समुद्र हाऊसमध्ये भेटणे आणि अमृतसरशी संबंधित समस्यांवर चर्चा करणे हा एक सुखद अनुभव होता.’
इथे काँग्रेस आणि भाजपचे काही नेते दबक्या आवाजात सांगत आहेत की सिद्धू दाम्पत्य पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे तरनजीतसिंग संधू यांची भाजपच्या केंद्रीय हायकमांडपर्यंत चांगलीच पोहोच आहे आणि निवडणूक हरल्यानंतरही पक्ष त्यांना मोठे पद देऊ शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App