विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी INDI आघाडीतले घटक पक्षात केवळ आपल्या भोवती गुरफटून घेतले असे नाही, तर त्यांनी आज रामलीला मैदानावरच्या INDI आघाडीच्या संकल्प रॅलीत थेट पंतप्रधानांच्या थाटात तुरुंगातून देशाला 6 गॅरेंटी देऊन टाकल्या. Wife Sunita reads out Arvind Kejriwal’s 6 poll guarantees at INDIA block rally
सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवालांचा संदेश रामलीला मैदानावरच्या संकल्पनेत वाचून दाखवला. त्यातले “बिटवीन द लाईन्स” हेच होते की, केजरीवालांनी तुरुंगातून स्वतःला INDI आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार परस्पर घोषित करून टाकले. पंतप्रधान पदावर बसल्याच्या थाटात त्यांनी देशाला 6 गॅरेंटी देऊन टाकल्या, वर आपण तुरुंगात असल्याने या गॅरंटींसाठी INDI आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांची परवानगी घेऊ शकलो नाही, अशीही मखलाशी केली.
INDI आघाडीची आजची संकल्प रॅली फक्त केजरीवालांचा उदो उदो करणारी ठरली. त्यांच्या तुरुंगातल्या नेतृत्वापुढे राहुल गांधींचे बाहेर असलेले नेतृत्व फिके ठरले. राहुल गांधींसमोर केजरीवाल समर्थकांनी अरविंद केजरीवाल झिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी स्टेजवर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह डाव्या पक्षांचे नेते हजर होते. यापैकी कोणाचाही जयजयकार रॅलीत झाला नाही. जयजयकार झाला तो फक्त अरविंद केजरीवालांचा!! त्यामुळे अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवालच INDI आघाडीचे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरले आणि राहुल गांधी किंवा अन्य कुठलाही नेता त्यांना विरोध करू शकला नाही.
सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवालांचा संदेश रॅलीत वाचून दाखविला. त्या संदेशातच अरविंद केजरीवालांनी देशातल्या 140 कोटी जनतेला 6 गॅरेंटी दिल्या. INDI आघाडी सत्तेवर आली, तर देशात 24 तास विदाऊट पॉवर कट वीज उपलब्ध करून दिली जाईल, देशातल्या सगळ्या गरिबांना मोफत वीज दिली जाईल, देशात सर्वत्र उत्तम दर्जाच्या सरकारी शाळा बांधू, गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला उत्तम शिक्षण देऊ, देशातल्या प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक बांधले जाईल, तसेच मध्यम आणि मोठ्या शहरांमध्ये सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जाईल, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून त्यांना हक्काची पीक किंमत दिली जाईल आणि दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. या त्या 6 गॅरंटी होत.
सुनीता केजरीवाल येथील प्रत्येक गॅरंटी वाचून दाखवत असताना आपको मंजूर है??, असा सवाल विचारत होता आणि त्यांना गर्दीतून होकाराचा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे या सगळ्या गॅरेंटी अरविंद केजरीवाल यांनी INDI आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिल्या असल्याचा आभास निर्माण करता आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App