पंजाबमध्ये अचानक का वाढली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रकरणे? परदेशात स्थायिक होण्याचा काय आहे संबंध? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परदेशात स्थायिक होण्याच्या इच्छेने पंजाबमध्ये धोकादायक ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेसचा आहे, ज्यांची प्रकरणे राज्यात सातत्याने वाढत आहेत. वास्तविक पंजाबमधील तरुण परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न घेऊन मोठे होतात. अशा परिस्थितीत तिथली IELTS (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टीम) परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे यश मानले जाते.Why the sudden increase in cases of contract marriage in Punjab? What is the relationship between settling abroad? Read in detail

पण असे लोक आहेत जे या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी परदेशात जाऊन स्थायिक होण्याचा नवा मार्ग शोधला आहे आणि तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज.



कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय?

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा दोन कुटुंबांमधील करार आहे, ज्या अंतर्गत कमी शिक्षण असलेली, अशिक्षित किंवा IELTS परीक्षा उत्तीर्ण न झालेली व्यक्ती करारानुसार गरीब आणि होतकरू मुलीशी लग्न करते. या करारांतर्गत स्पाऊस व्हिसाच्या बदल्यात मुलीच्या परदेशात शिक्षणाचा संपूर्ण खर्च तो उचलतो.

लग्नासंदर्भात पंजाबच्या वर्तमानपत्रांमध्ये अशा अनेक दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात, ज्यामध्ये IELTS वधूंची मागणी केली जाते. अशा जाहिरातींचे परीक्षण केल्यावर असे आढळून आले की असे संभाव्य वर उघडपणे आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वधूंशी व्यवहार करतात. या प्रकारच्या जाहिराती सहसा IELTS, PR आणि स्टडी गर्लसारख्या कीवर्डने सुरू होतात.

जाहिरातीत लिहिले जाते ‘IELTS मुलगी हवी’. ‘कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये मुलीचा सर्व खर्च जाट मुलगा उचलणार’. किंवा ‘वर्क परमिटवर कॅनडामध्ये काम करणारा शेफ कॅनडामधून स्टडी व्हिसा मुलगी शोधत आहे’.

तज्ज्ञांच्या मते, या मुलांची पहिली अट असते की मुलगी आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण असावी. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार्‍या मुलांपैकी बहुतेक मुले अशी असतात जी आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत.

यामुळेच ते शिक्षणात हुशार मुलींचा शोध घेतात पण हा करार दोन्ही कुटुंबांमधील गुपित असते. अनेक प्रकरणांमध्ये, वराची बाजू वधूच्या बाजूने मालमत्ता देते आणि मुलीचा सर्व खर्च उचलण्याचे वचन देते. दोन्ही कुटुंबांमध्ये लेखी करार होतात.

परदेशात स्थायिक होण्याची क्रेझ

आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण होण्याचा किंवा परदेशात जाण्याचा मुख्य उद्देश पंजाबमधील वाढती बेरोजगारी आणि अंमली पदार्थांची समस्या आहे. कुटुंबांना आपल्या मुलांना अशा वातावरणापासून दूर ठेवायचे आहे. लहानपणापासूनच मुला-मुलींच्या मनात ठसवले जाते की त्यांचे सोनेरी भविष्य परदेशात आहे.

आयईएलटीएसची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तरुणांवर खूप दबाव असतो. त्यांना परदेशात स्थायिक होण्याची इतकी क्रेझ आहे की ते कॅनडासारख्या युरोपीय आणि उत्तर अमेरिकन देशांतील मंदीकडेही दुर्लक्ष करतात.

एनआरआय वधूंकडून होते फसवणूक

पंजाबमधील विवाह उद्योगात अनेक मोठे बदल झाले आहेत. एनआरआय वरांपासून सुरू झालेला ट्रेंड आता आयईएलटीएस मुली किंवा परदेशात शिकणाऱ्या मुलींकडे वळला आहे. आता पंजाबी वर एनआरआय वधू शोधतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा त्याचाच परिणाम आहे.

पंजाबच्या विविध भागातील अनेक ट्रॅव्हल एजंट अशा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून मोठी कमाई करत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये परदेशात स्थायिक झालेल्या या महिलांना पेपर मॅरेजसाठी प्रचंड पैसा मिळतो. आजकाल असेदेखील दिसून आले आहे की अशा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये या IELTS मुली अनेक वरांची फसवणूक करतात.

अनेक प्रकरणांमध्ये असेदेखील दिसून आले आहे की ज्या मुलींनी काँट्रॅक्ट मॅरेजला होकार दिला आहे, त्या IELTS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत किंवा परदेशात त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे लग्न कोर्टात बेकायदेशीर ठरते आणि अशा स्थितीत मुले त्यांचे पैसे परत मागू लागतात.

तज्ज्ञांच्या मते, अशा विवाहांवर तात्काळ बंदी घालण्याची गरज आहे. त्यामुळे लग्नासारखी संस्थाही कलंकित होत आहेत. पती-पत्नी व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया कठोर असावी जेणेकरून करार विवाहाच्या नावाखाली फसवणूक होणार नाही.

Why the sudden increase in cases of contract marriage in Punjab? What is the relationship between settling abroad? Read in detail

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात