विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आजपर्यंतच्या कॉँग्रेस किंवा समाजवादी पक्षाच्या घराणेशाहीवर चालणाºया सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत? तिहेरी तलाकसारख्या मुद्यांवर डोळेझाक का केली असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.Why the dynastic governments did not understand the pain of the Muslim sisters, why did they turn a blind eye, the question of the Prime Minister
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत प्रचारात बोलताना पंतप्रधानांनी कॉँग्रेस आणि समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज हे लोक म्हणतात आम्हाला कुटुंब आहे. कुटुंबाच्या वेदना माहित आहे. मग त्यांनी मुस्लिम मुलींची काळजी का घेतली नाही.
तिहेरी तलाकसारख्या पध्दतीमुळे कित्येक भगिनींना आपल्या चिमुकल्यांसह माहेरी येऊन राहो लागत होते. माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी या मुलींच्या समस्यांकडे लक्ष का दिले नाही. मुस्लिम महिला (विवाहावरील अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१९ मध्ये रिाज्यसभेने मंजूर केले.
मुस्लिम पुरुषांनी तीनदा तलाक उच्चारून त्यांच्या पत्नींना त्वरित घटस्फोट देण्याच्या प्रथेला कायदा गुन्हेगार ठरवतो.मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशचा विकास होणे म्हणजे देशाचा किवास होणे आहे. उत्तर प्रदेशात ही क्षमता आहे.
मात्र, गेल्या अनेक दशकांपासून घराणेशाहीच्या सरकारांनी केवळ आपली घरे भरण्याची कामे केली. उत्तर प्रदेशच्या क्षमतांना पूर्ण न्याय दिला नाही. गरीबांनी स्वत:च्या पायावर कधी उभेच राहू नये अशी येथील तथाकथित राजवंशाची इच्छा आहे. आम्ही मात्र, गरिबांची काळजी घेतो आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App