विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातच्या जीएसटी ( GST) विभागाने गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) सहकार्याने एका फर्मच्या अध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. बनावट पावत्या वापरल्याप्रकरणी जीएसटी विभागाने भावनगर येथील एका फर्मच्या अध्यक्षाला अटक केली आहे. अध्यक्षावर ७६२ कोटी रुपयांची बनावट चलने, पावत्या वापरून १३७ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केल्याचा आरोप आहे. 762 crore bogus man arrestedNilesh Patel; Action of Gujarat GST Department
पटेलला अटक करण्यासाठी एटीएसची मदत
यापूर्वी, माधव कॉपर लिमिटेडचे अध्यक्ष नीलेश पटेल यांना जीएसटी पथकाने अटक केली होती आणि जीएसटी अधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक देऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले होते. मात्र यावेळी पटेल यांना अटक करण्यासाठी एटीएसची मदत घेण्यात आली.
पटेल यांच्यावर १३७ कोटी रुपयांच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी ७६२ कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी करून राज्याच्या तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप आहे. राज्याच्या जीएसटी विभागाने गेल्या वर्षी जुलैमध्ये या फसवणुकीचा पर्दाफाश केला होता आणि या संदर्भात अनेकांना अटक केली होती, तर मुख्य आरोपी पटेल फरार होता.
मात्र, तो हजर न झाल्याने विभागाने त्याची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, न्यायालयाने त्याच्याविरुद्ध समन्स बजावले होते, त्याला त्याने प्रतिसाद दिला नाही. जीएसटी विभागाने सांगितले की, २० फेब्रुवारी रोजी अटक करण्याच्या पहिल्या प्रयत्नात हा व्यापारी पळून गेला होता. त्यानंतर विभागाने एटीएसशी संपर्क साधला, त्यांनी त्याला अहमदाबाद येथून अटक केली.
छाप्यांमध्ये दस्तऐवज जप्त
गेल्या वर्षी त्याच्या संचालकांच्या ठिकाणांवर, कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकून, राज्य जीएसटीने डिजिटल डेटासह अनेक बोगस दस्तऐवज जप्त केले होते. ११ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने पटेल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्याला अटकेपासून एक आठवड्याचे संरक्षण दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App