वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर ताबा मिळवण्याचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला पक्षातील बहुमत सिद्ध करण्यासाठी लेखी पुरावे मागितले आहेत. या प्रकरणावर 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.Whose Shiv Sena? Prove majority with evidence, Uddhav-Shinde group directs Election Commission
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचा दावा आणि आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला असून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटानेही शिंदे गटाविरोधात आयोगाकडे पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षातील सदस्यांमध्ये बहुमत असल्याचे लेखी पुरावेच मागितले आहेत.
शिवसेना पक्षावर आपलीच पकड असल्याचे सिद्ध करण्यासाठी उद्धव गटाने शिंदे गटाच्या आमदार-पदाधिकाऱ्यांची पक्षातील विविध पदांवरून हकालपट्टी केली आहे. तर, राष्ट्रीय कार्यकारिणी ते शाखा पातळीवरही फूट पडली असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिंदे गटही शिवसेनेतील उद्धव समर्थक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करीत आहे. दरम्यान, उद्धव आणि शिंदे गटाने आयोगाकडे पत्र पाठवले आहे. आयोगाने दोन्ही गटांची पत्रे एकमेकांनाही पाठवली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App