विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : कम्युनिस्ट पक्षाकडे तरुण कार्यकर्ते नाही असे म्हटले जाते. मात्र, केरळमधील एका लग्नाच्या चर्चेने हा समज खोटा ठरला आहे. देशातील सर्वात कमी वयाची महापौर आणि सर्वात तरुण आमदार लग्न करणार आहेत.Who says there are no young people in the Communist Party, the youngest mayor and MLA will get married
त्रिवेंद्रमपूरम मधील महापौर आर्या राजेंद्रन आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमदार सचिन देव हे विवाहबंधनात अडकणार आहे. महापौर आर्या यांनी सांगितलं की, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या निर्णयप्रक्रिकेत घरच्यांनाही सहभागी करुन घेणार आहे.
आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीनं विचार करुन योग्य ती तारिख ठरवली जाणार आहे. यावेळी कुणाला बोलवायचे कुणाला नाही याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. आर्या राजेंद्रन या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्या आहेत. त्या त्रिवेंद्रमपूरमच्या महापौर आहेत. 2020 मध्ये त्या 21 वर्षांच्या असताना देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
देव हे सीपीआय पक्षाचे सदस्य आहेत. केरळ विधानसभेचे सर्वात तरुण आमदार असणारे देव हे बलुसरी हे मतदारसंघाचे आमदार आहेत. देव आणि राजेंद्रन हे एकमेकांना विद्यार्थी संघटनेत असल्यापासून ओळखत होते. त्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.
आणि ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आम्ही लग्नाचा निर्णय हा काही एकट्याने घेतलेला नाही. त्यामध्ये कुटूंबियांना देखील सहभागी करुन घेतले आहे. त्यांचे मतही विचारात घेणार असल्याचे देव यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App