विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका ३५ वर्षीय व्यक्तीचे हात पाय तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. ही हत्या कोणी केली व का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांना कारण अथवा गुन्हेगार याचा तपास लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Who is murderer in Sindhu Border killing case?
या हत्येबाबत संयुक्त किसान मोर्चे नेते बलबीर सिंग यांनी आरोप केला आहे. या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चा मुख्य तंबूजवळ बॅरिकेट्सना बांधण्यामागे निहंगा समूहातील लोक असल्याचा आरोप बलबीर सिंग यांनी केला आहे. ते म्हणाले की शेतकरी आंदोलनाला निहंगा समाज सुरुवातीपासूनच अडचणी आणत आहे.
Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश
ही हत्या निहंगा समाजातील लोकांनी केली आहे व त्यांनी हे मान्य केले आहे. निहंगा सुरुवातीपासूनच आम्हाला अडचणीत आणत आहेत असे संयुक्त किसान मोर्चा नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. या घटनेशी आपला काही संबंध नाही, असे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले. संयुक्त किसान मोर्चाने या हत्येतील गुन्हेगारांच्यावर कारवाईसाठी हरियाणा सरकारला मदत करण्याची तयारी दाखवली आहे.
पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले की सोनीपत मधील कुंडलीत येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. आज पहाटे पाच वाजता बॅरिकेटला बांधलेला मृतदेह दिसल्याची माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एक मृतदेह हात-पाय तोडलेल्या अवस्थेत व बॅरिकेटला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
हंसराज म्हणाले की, या घटनेला कोण जबाबदार आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे व याबाबत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App