भाजपने आपल्या राज्यसभेच्या खासदारांना ८ फेब्रुवारीला सभागृहात उपस्थित राहून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्याचवेळी ही बातमी समोर आल्यानंतर ट्विटरवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत.Whip issued to BJP Rajya Sabha MPs, all instructed to be present on 8th February
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपने आपल्या राज्यसभेच्या खासदारांना ८ फेब्रुवारीला सभागृहात उपस्थित राहून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्याचवेळी ही बातमी समोर आल्यानंतर ट्विटरवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत. एका यूजरने ट्विट करून लिहिले की, विशेष काही होणार नाही. राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील. विरोधक या प्रस्तावाच्या विरोधात दुरुस्तीसाठी दबाव आणू शकतात. त्यामुळेच व्हीप जारी करण्यात आला आहे, असे मला वाटते.
BJP has issued three line whip to its Rajya Sabha MPs to be present in the House on 8th February and support govt's stand. — ANI (@ANI) February 5, 2022
BJP has issued three line whip to its Rajya Sabha MPs to be present in the House on 8th February and support govt's stand.
— ANI (@ANI) February 5, 2022
याव्यतिरिक्त, एका युजरने लिहिले की गुगलनुसार, तीन ओळींचा व्हिप हा पक्षाच्या स्थितीनुसार उपस्थित राहण्याची आणि मतदान करण्याची कठोर सूचना आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास सामान्यतः गंभीर परिणाम होतील. व्हीपनंतर गैरहजर राहण्यास परवानगी दिली जाऊ शकते, परंतु एक गंभीर कारण आवश्यक आहे. याशिवाय, दुसर्या युजरने असा अंदाज लावला आहे की, समान नागरी संहितेबाबत एक प्रस्ताव येऊ शकतो, ज्याला पास होण्यासाठी संख्याबळ आवश्यक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App