कोरोना लसीवर टीका करता करता राहूल गांधी यांनीच अद्याप लस घेतलेली नाही. कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. कॉँग्रेस पक्षाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.While criticizing the Corona vaccine, Rahul Gandhi not vaccinated, but Sonia Gandhi took both doses
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोना लसीवर टीका करता करता राहूल गांधी यांनीच अद्याप लस घेतलेली नाही. कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. कॉँग्रेस पक्षाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.
कॉँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार राहूल गांधी हे १६ मे रोजी लसीकरण करून घेणार होते. मात्र, त्यांना २० एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांना तीन महिने लसीकरण करून घेता येणार नाही.
राहूल गांधी हे सातत्याने कोरोना लसीकरणावरून टीका करत आहेत. सुरूवातीला कॉँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वदेशी कोव्हॅक्सिनवर शंका घेतली होती. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लसीकरण करून घेतले आहे का? असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता.
सोनिया आणि राहूल गांधी यांनी लसीकरण करून घेतले आहे का? असल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती सार्वजनिक करावी, असे आवाहनही केले होते. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली आहे.भारतात लसींचा तुटवडा नाही. पण राहुल गांधींना मात्र आपल्यावरील दुर्लक्षाचा सामना करावा लागतोय.
राहुल गांधी अद्याप करोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाहीए का? की त्यांनी त्यांनी आधीच लस घेतली आहे? जसे ते विदेशात गुपचुप दौरे करून येतात आणि उघड करत नाहीत, तसंच लसीबाबात आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App