कोण आहे राहूल गांधींचा लाडका पीडी ज्याच्यामुळे हेमंत बिस्वा सरमा बनले आसामचे मुख्यमंत्री


राहूल गांधी यांचा लाडका पीडी. त्याच्यामुळेच मी आसामचा मुख्यमंत्री बनलो असा गौप्यस्फोट हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. या पीडीच्या डीशमधून बिस्किटे खाण्यास आपण नकार दिला होता, असेही सरमा यांनी सांगितले आहे. Who is Rahul Gandhi’s darling PD who made Hemant Biswa Sarma the Chief Minister of Assam


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी: राहूल गांधी यांचा लाडका पीडी. त्याच्यामुळेच मी आसामचा मुख्यमंत्री बनलो असा गौप्यस्फोट हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. या पीडीच्या डीशमधून बिस्किटे खाण्यास आपण नकार दिला होता, असेही सरमा यांनी सांगितले आहे.

सरमा हे एकेकाळी कॉँग्रेसचे आसाममधील कॉँग्रेसचे वजनदार नेते होते. तत्कालिन मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्यानंतर दुसºया क्रमांकाचे स्थान त्यांचेच होते. परंतु, गोगाई यांनी आपल्या मुलाला राजकारणात उत्तराधिकारी बनविण्यासाठी सरमा यांचे खच्चीकरण सुरू केले.त्यामुळे सरमा यांनी राहूल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पीडीमुळेच सरमा यांची राहूल गांधी यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि यंदाच्या निवडणुकीनंतर ते आसामचे मुख्यमंत्री बनले.

एका कार्यक्रमात सरमा यांनी राहूल गांधी आणि या पीडीचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात राहुल गांधींचे योगदान आहे. ते म्हणाले, त्यावेळी आसाममधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक बैठक झाली होती.

या बैठकीत भाजपचा पराभव करण्यावर चर्चा झाली. या बैठीक सरमा आणि राहुल गांधी यांच्याशिवाय पक्षाचे काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. पण राहुल गांधींना या बैठकीत कुठलाही रस दिसून आला नाही.

ते सतत आपल्या कुत्र्यांसोबत खेळत होते. बैठकीनंतर आपल्याला कळलं की त्या कुत्र्याचं नाव पीडी आहे.बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी चहा-कॉफी मागवण्यात आली.

यावेळी राहुल गांधींजवळ बसलेल्या कुत्रा टेबलाजवळ गेला आणि तिथे ठेवलेल्या प्लेटमधील एक बिक्सिट घेऊन खाऊ लागला. यानंतर राहुल गांधी आमच्याकडे बघून हसू लागले. आपल्याला पाहून ते असं का करत आहेत? असा विचार मी करत होतो,

असं सरमा यांनी सांगितले. कुत्र्याने उष्टी केलेली बिस्कीटाची प्लेट बदलवून राहुल गांधी दुसरी प्लेट मागवतील याची आपण बैठकीत चहाचा कप घेऊन वाट बघत राहिलो. पण असं झालं नाही.

त्यावेली तरुण गोगोई आणि सी. पी. जोशी यांच्यासारखे बडे नेते त्याच प्लेटमधून बिस्कीट उचलून खाऊ लागल्याचे आपण बघितल. आपण नेहमी राहुल गांधींना भेटायला जात नव्हतो. यामुळे ही एक सामान्य बाब असल्याचा आपल्याला अंदाज आला, असं सरमा म्हणाले.

राहुल गांधींच्या प्रत्येक बैठकीत असंच काहीसं होत असणार याचा आपल्याला अंदाज आला. अशा व्यक्तीसोबत आणखी काळ काम करू शकत नाही, हे या घटनेनंतर आपण ठरवलं.

यामुळे राहुल गांधींचा मी खूप आभारी आहे. मी मुख्यमंत्री होण्यात कुठे ना कुठे त्या घटनेचे मोठे योगदान आहे, असे सरमा यांनी सांगितले.
राहूल गांधी यांचा पीडी नावाचा कुत्रा अत्यंत लाडका आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यावेळी राहूल गांधी आपला लाडका कुत्रा पीडी याच्यासोबत राईडसाठी गेले होते

Who is Rahul Gandhi’s darling PD who made Hemant Biswa Sarma the Chief Minister of Assam

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी