जनरल रावत यांना निरोप देताना अवघा देश शोकसागरात, प्रियांका गांधी मात्र गोव्यात निवडणूक प्रचारात व्यग्र, स्थानिकांसोबत केले नृत्य


तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर १२ जणांचे निधन झाले. जनरल बिपिन रावत यांच्यावर आज देशाच्या राजधानीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आहेत. दरम्यान, अवघा देश शोकसागरात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मात्र गोव्यात निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या वागण्याला असंवेदनशील म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.While Country Mourns on General Rawat sad Demise, Priyanka Gandhi danced with the locals on election campaign in Goa


प्रतिनिधी

पणजी : तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर १२ जणांचे निधन झाले. जनरल बिपिन रावत यांच्यावर आज देशाच्या राजधानीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आहेत. दरम्यान, अवघा देश शोकसागरात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मात्र गोव्यात निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या वागण्याला असंवेदनशील म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.प्रियांका गांधी निवडणूक दौऱ्यावर गोव्यात आलेल्या आहेत. यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत पारंपरिक नृत्यही केले. मात्र देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या अपघाती निधनाची एवढी मोठी दु:खद घटना घडलेली असताना प्रियांका गांधी अशा प्रकारे नृत्य करणारे शोभणारे आहे का?, असा सवाल आता विचारला जात आहे.

पुढच्या वर्षी पाच राज्यांत निवडणुका

2022 मध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोव्याचाही समावेश आहे. गोव्यात राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठमोठे हादरे बसत आहेत. शुक्रवारी प्रियांका गांधी गोवा दौऱ्यावर जाण्यापूर्वी पोर्वोरिम विधानसभा मतदारसंघातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

राज्यात निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस गंभीर नसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नायत म्हणाले, “राज्यातील निवडणुकांबाबत काँग्रेस पक्ष गंभीर दिसत नाही. आजपर्यंत त्यांनी त्याची कोणतीही तयारी सुरू केलेली नाही.

गोव्यात शिवसेना आणि काँग्रेसची युती

यापूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत प्रियांका यांच्यासोबत तासभर बैठक घेतली होती आणि नंतर गोव्यातील पक्षांमध्ये निवडणूकपूर्व युतीचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून नेत्यांचे वारंवार बाहेर पडणे हे पक्षासाठी चांगले लक्षण नाही.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी सप्टेंबरमध्ये काँग्रेस सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्य विधानसभेचा राजीनामा दिला. याआधी ऑक्टोबरमध्ये राहुल गांधीही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले होते.

While Country Mourns on General Rawat sad Demise, Priyanka Gandhi danced with the locals on election campaign in Goa

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात