विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : गेल्या आठवड्यात राज्यभरात विविध ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस झाला. त्याचा परिणाम बुलडाणा जिल्ह्यात झाला, हरभरा आणि तुरीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील कांद्याने पाणी आल्याचे चित्र आहे, त्यामुळे सर्वच पिके घेणारे शेतकरी संकटात सापडलेत.Tears in the eyes; Onion grower in crisis
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कांद्याचे पीक देखील प्रामुख्याने घेतले जाते खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानाची घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र, कांद्याची जमिनीत वाढत झाली नसल्याने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, तर दुसरीकडे या कांद्याला आता मातीमोल भाव मिळत खर्चही निघत नाही
नांद्राकोळी येथील शेतकऱ्याने एक एकरामध्ये चार किलो कांदा बियाण्याची पेरणी केली, मशागत केल्यानंतर आता हा कांदा काढला जातोय, कांद्याची पेरणी केल्यापासून ते कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याला एकरी ६० हजार रुपयांच्या जवळपास खर्च आला
. आणि यातून उत्पन्न हे केवळ ३० ते ३५ हजार रुपये होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडलाय.सुरुवातीच्या काळामध्ये कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली, मात्र आता भाव झपाट्याने कमी झाल्याने या शेतकऱ्याच्या डोळ्याच्या कांद्याने पाणी आणले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more