विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर या हेरगिरी प्रकरणात मनगढंत मुद्यांवर कॉँग्रेस संसदेचा वेळ वाया घालवित आहे. मात्र, त्यांनी हे विसरू नये की सत्तेवर असताना कॉँग्रेस हेरगिरीतील जेम्स बॉँड होती असा आरोप केंद्री अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.When Congress was in power, James Bond in spying, Pegasus spyware case, Mukhtar Abbas Naqvi’s retaliation
पावसाळी अधिवेशन गुंडाळणार असल्याची अफवा असल्याचे सांगून नक्वी म्हणाले, पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हिताच्या प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. संसदेत निर्मांण झालेला गतिरोध लवकरच हटेल आणि दोन्ही सभागृहांतील कामकाज सुरू होईल, असा मला विश्वास आहे. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून कोणत्याही परिस्थितीत गुंडाळले जाणार नाही.
नक्वी म्हणाले, कॉँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष संसदेत गोंधळ घालत आहे. त्यंना लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात कोणताही रस नाही. त्यांनी पहिल्यांदा मागणी केली की कोरोनावर चर्चा व्हावी. आम्ही त्याला मान्यता दिली तर हा मुद्दा सोडून दिला. त्यानंतर शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली.
मात्र, हा मुद्दाही सोडून दिला. त्यांना शेतीमालाच्या किंमतींचे देणेघेणे नाही. देशातील अनेक भागात पुराची समस्या आहे. पण त्यांना त्याचीही काळजी नाही. कोणत्याही प्रश्नावर विरोधकांना चर्चा होऊ द्यायची नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App