भारतात 97 कोटी मतदारांची विश्वासार्ह लोकशाही; पण कथित लोकशाही समर्थक पाश्चात्य माध्यमांची शिव्यांची लाखोली!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात तब्बल 97 कोटी मतदारांची विश्वासार्ह लोकशाही आहे. हे सगळे मतदार आगामी दोन महिन्यांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीचे नवे सरकार निवडणार आहेत. किंबहुना त्यातला पहिला टप्पा 102 मतदारसंघांमध्ये पार देखील पडला आहे. तिथे ना हिंसाचार झाला, ना कुठला गैरप्रकार. मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे बटन दाबून त्याचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील देखील केले. Western media abusive about huge 97 crore voters mandate in Indian democracy

भारतीय लोकशाहीचा हा रथ मतदानातून टप्प्याटप्प्याने पुढे जाईल आणि 4 जून 2019 रोजी प्रत्यक्ष निकाल हाती येऊन भारताचे आणि जगाचे भवितव्य घडवणारे सरकार अस्तित्वात येईल. ते 97 कोटी मतदारांच्या जनमताच्या कौलातून आलेले सरकार असेल. पण “लोकशाही म्हणजे आपणच”, “लोकशाहीची आपण ठरवू तीच व्याख्या”, “आपण सांगू तोच लोकशाहीचा खरा निकष”, असा अहंकारी दर्प बाळगणाऱ्या पाश्चात्य माध्यमांनी मात्र भारतीय लोकशाहीच्या प्रचंड मतदार संख्येकडे दुर्लक्ष करून भारतीय लोकशाही व्यवस्थेला शिव्यांची लाखोलीच वाहिली आहे. प्रचंड मतदार संख्येने दिलेल्या कौलावर “एकाधिकारशाही”, “हुकूमशाही”, “नव भांडवलदारशाही” अशा शब्दांची फुले उधळली आहेत. यामध्ये न्यूयॉर्क टाइम्स, युके गार्डियन, रॉयटर्स, ल मॉन्द पासून ब्लूमबर्ग पर्यंत सगळ्या माध्यमांचा समावेश आहे. निवडणुकीच्या मार्गाने मोदींचा विजय या कुठल्याच माध्यमांना मान्य नाही. तो सहज आणि सरळ पणे ते स्वीकारणार नाहीत, हेच त्यांच्या कमेंट मधून दिसून येते.

Modification, Autocracy, Authoritarianism, divisions deepen, Democracy Dies, Proto-Fascist Regime  हे आणि असे अनेक भारतातल्या लोकशाही विषयी आणि मोदींच्या राजवटी विषयी पाश्चात्य माध्यमांनी वापरलेले शब्द आहेत. मोदींच्या राजवटीत भारत असहिष्णू झाला, मोदींच्या मेक इन इंडिया धोरणाने भारतात नोकऱ्या तयार केल्या नाहीत, मोदींच्या विजयाने भारतात जागतिक लोकशाहीचा अंत होईल, मोदी जिंकले तर भारतातल्या नागरी हक्कांवर गदा येईल, मोदींच्या विजयामुळे एकाधिकारशाही वाढून भारतातले कायद्याचे राज्य संपुष्टात येईल, अशी असंख्य “मुक्ताफळे” पाश्चात्त्य माध्यमांनी उधळून भारतातल्या 97 कोटी मतदारांचा अपमान केला आहे.

मोदींची एकाधिकारशाही रोखण्यासाठी भारतातल्या विरोधकांबरोबर जागतिक लोकशाहीने हात मिळवणे केले पाहिजे अशी “अफलातून” सूचना याच पाश्चात्त्य माध्यमांनी केली आहे. मोदींची एकाधिकारशाही रोखण्यासाठी कोण पुढे येईल??, असा सवाल जेकब मॅगझिने केला आहे.

Western media abusive about huge 97 crore voters mandate in Indian democracy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात