या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी सीबीआयने पूर्व मेदिनीपूर येथून 11 जणांना अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमने पाचवे आरोपपत्र दाखल केले आहे. West Bengal Post Poll Violence CBI arrested 11 people in murder case of BJP worker in Nandigram
वृत्तसंस्था
कोलकाता : या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी सीबीआयने पूर्व मेदिनीपूर येथून 11 जणांना अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमने पाचवे आरोपपत्र दाखल केले आहे.
भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये टीएमसी नेते शेख सुफियान यांचे जावई शेख हकीबुल यांचाही समावेश आहे. शेख हे ममता बॅनर्जी यांचे खूप जवळचे मानले जातात. नंदीग्राममध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान ते ममता बॅनर्जी यांचे निवडणूक एजंट राहिले आहेत.
सीबीआयच्या या कारवाईबाबत राजकारणही सुरू झाले आहे. टीएमसीने या कारवाईला भाजपकडून सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. टीएमसीने या कारवाईला नंदिग्राममधून ममता बॅनर्जींना पराभूत करणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्या वक्तव्याशी जोडले आहे. या कथित निवेदनात शुभेंदू अधिकारी म्हणाले होते की, ज्यांची नावे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या तपासात पुढे आली आहेत त्यांना अटक केली जाईल. टीएमसीचे आरोप फेटाळून लावत भाजपने म्हटले आहे की, या कारवाईचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. सीबीआयचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केला जात असून त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही.
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमने पाचवे आरोपपत्र दाखल केले आहे. केंद्रीय एजन्सीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देवव्रत मैते यांच्या हत्येप्रकरणी हल्दिया न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे आरोपपत्र शेख फतेनूर, शेख मिझानूर आणि शेख इमदुलाल यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहे. तिघेही तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात आहे. खुनाच्या संदर्भात केंद्रीय एजन्सीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवडणूक एजंट शेख सुफियान आणि तृणमूलच्या इतर दोन नेत्यांची चौकशी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App