दुखापत झाल्याने ममता बॅनर्जींना रुग्णालयात नेले
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जलपाईगुडी ते उत्तर बंगालमधील बागडोगरा येथे उड्डाण करत असताना, सलुगाडा आर्मी एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तपासणीठी ममता बॅनर्जी यांना कोलकाता विमानतळावरून थेट कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. West Bengal Chief Minister Mamata Banerjees helicopter emergency landing
ममता बॅनर्जी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी जखमी झाल्या. कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्क्यामुळे ममताच्या पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे.
विशेष म्हणजे पंचायत निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पाहायला मिळत आहे. कूचबिहारच्या दिनहाटा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रॅलीनंतर दुसऱ्या दिवशी हिंसाचार झाला. येथे टीएमसीच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान एका टीएमसी कार्यकर्त्याचाही गोळी लागल्याने मृत्यू झाला. तसेच अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App