‘’जर ‘केसीआर’ अशीच नौटंकी करत राहिले, तर…’’ संजय राऊतांचं विधान!


‘’आता अचानक काय आमच्या देवाने तुम्हाला एवढा मोठा ताफा घेऊन बोलावलं आहे का?’’ असा सवालही राऊतांनी  केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह सोलापुरात आले आहेत. आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे पोटनिवडणुकीतले उमेदवार भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश झाला आहे. याशिवाय केसीआर हे पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट के. चंद्रशेखर राव यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. MP Sanjay Raut criticizes Telangana Chief Minister KCRs visit to Maharashtra

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर मटण खाऊन पंढरपूरला येऊ नका. वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असा इशाराही केसीआर यांना दिला आहे. तर केसीआर यांची नियत साफ नाही, एमआयएम यांच्यासारखीच भारत राष्ट्र समिती भाजपची बी टीम आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘’महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘केसीआर’ यांचा काही परिणाम होणार नाही, परिणाम होईल तो तेलंगणाच्या राजकारणावर होईल. जर केसीआर अशीच नौटंकी करत राहिले, तर तेलंगणात हारतील. पराभवाच्या भीतीमुळे ते महाराष्ट्रात घुसत आहेत. इथे फार मोठा वाहन ताफा घेऊन महाराष्ट्रात केसीआर घुसले. मोठाले होर्डिंग्ज लावले गेले. परंतु दिल्लीत त्यांचा पक्ष पूर्णपणे तुटत आहे. त्यांचे नेते, माजी खासदार काँग्रेसमध्ये गेले आहेत.’’

याचबरोबर ‘’ही लढाई काँग्रेस आणि केसीआर यांच्यातील आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी बसून काही चर्चा करावी. परंतु तेलंगणात राजकारण होत आहे आणि त्याचा बदला तुम्ही महाराष्ट्रात घ्यायला जात आहात, तर मी म्हणेण तुम्ही भाजपासाठी काम करत आहात. तुम्ही भाजपाची बी टीम आहात. त्याची भरपाई तुम्हाला तेलंगणात करावी लागले, हे मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रात काही परिणाम होणार नाही. इथे महाविकास आघाडी मजबुत आहे,  मजबुत राहील. हैदराबादेतूनच एमआयएमचे ओवेसी आले होते, आता त्याच हैदराबादेतून भाजपाने केसीआर यांना पाठवलं आहे, असं वाटतय.’’ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

याशिवाय ‘’केसीआर हे एक लढवय्ये नेते आहेत. मग तुम्ही असे भाजपाला का शरण जात आहात. आम्हाला महाराष्ट्रात काही फरक पडत नाही. तुम्ही विठ्ठल भक्त कधीपासून झालात, तुम्ही पंढरपुरच्या मंदिरात जात आहात. एवढ्या वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात, दोन टर्म तुम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही केंद्रात मंत्री होता, तुम्ही आंध्रातही मंत्री होता. तुम्ही फार मोठे नेते आहात, लोकप्रिय नेते आहात. मग एवढ्या वर्षातच तुम्ही पंढरपुरला जाऊन विठोबाचं दर्शन घ्यायला हवं होतं. अचानक काय आमच्या देवाने तुम्हाला एवढा मोठा ताफा घेऊन बोलावलं आहे का? की पंढरपुरात येऊन शक्तिप्रदर्शन करा. महाराष्ट्रात काही जणांना तुम्ही पकडलं  आहे, पैशांच्या ताकदीवर विकत घेतलं आहे. प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र काहीच फरक पडणार नाही. तुम्ही जेवढी ताकद महाराष्ट्रात लावाल, तेवढंच तुम्ही  तेलंगणात कमजोर व्हाल आणि तेलंगणात पराभूत व्हाल. ’’ अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी केसीआर यांच्यावर निशाणा साधला आहे.

MP Sanjay Raut criticizes Telangana Chief Minister KCRs visit to Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात