विशेष प्रतिनिधी
पुणे :आदी पुरुष सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटून गेला असला तरी . रोज या सिनेमाबद्दलचे नवनवीन वाद समोर येत आहेत. या सिनेमावर सिनेमातील पात्रांच्या संवादावर सध्या सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. Aadi Purush controversy .
रामान हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय असल्यानं आधी पुरुष या सिनेमामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्याची सध्या चर्चा आहे.अशातच वाल्मिकी रामायणाचे कथाकार,बागेश्वर बाबा अर्थात धिरेंद्र शास्त्री सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणामध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.
त्यांनी आता या आदी पुरुष सिनेमाच्या वादात उडी घेतली आहे. आदी पुरुष या सिनेमावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियातून चांगलीच व्हायरल होती आहे.
कॉपी करणे ही चांगली गोष्ट आहे मात्र अशी कॉपी करू नये असं बाबा म्हणाले. बाबा पुढे म्हणतात, आजकाल असा चित्रपट आला आहे, ज्यामध्ये हनुमानजींना असं दाखवलं गेलं आहे कि फक्त वीर बजरंगबलीच त्यांना वाचवू शकतात. धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला नाही, पण त्यात किती खालच्या पातळीचे संवाद बोलले गेले आहेत हे मला कोणीतरी सांगितले. तेल तेरे बाप का… असे ज्यांनी लिहिले आहे ते आयुष्यात कुठेतरी अडकले तर फक्त जय-जय सीतारामच म्हणतील.
सनातन धर्माचे जतन होईल, असा चित्रपट बनवला पाहिजे. मी एवढेच म्हणेन की असे चित्रपट बनवणाऱ्यांना हनुमानजी सुबुद्धी द्यावी.हनुमान हा बुद्धिबल आणि संयमी असा देव आहे . अशा प्रकारचे संवाद त्यांच्या तोंडी असणं शोभत नाही. आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी देखील या सगळ्याचा विचार केला पाहिजे. चित्रपट हा अनेक मनावर परिणाम करतो. त्यामुळे अशा प्रकारचे चित्रण हे कायम मनावर कोरल्या जातं आणि त्यातून चुकीचा संदर्भ दिला जातो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App