विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो, असे भावनिक वक्तव्य कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी केले आहे. गांधी भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाच्या आरोपाला त्या उत्तर देत होत्या.We are brothers and sisters, I can give my life for my brother, an emotional statement by Priyanka Gandhi
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देतानाआमच्यात मतभेद कुठे आहेत असा सवाल करत प्रियंका गांधी म्हणाल्या, संघर्ष योगीजींच्या मनात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा यांच्यातील मतभेदांवरून योगी आदित्यनाथ असं बोलत आहे.
पंजाबच्या कोटकापुरा येथे नई सोच नया पंजाब निवडणूक रॅलीला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टीवर टीका करताना म्हणाल्या, आम आदमी पार्टी आरएसएसमधून उदयास आली आहे. दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्यसेवा संस्थांच्या नावावर काहीही नाही. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App