WATCH : एफआयआरनंतरही कालिचरण महाराज म्हणाले, मला पश्चाताप नाही, फाशी दिली तरी मान्य; गोडसेंना माझा प्रणामच!

रायपूरच्या धर्म संसदेत महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले महाराष्ट्रातील संत कालीचरण यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. गांधींविरुद्ध आक्षेपार्ह बोलल्याने माझ्यावर एफआयआर दाखल केली, त्याबद्दल मला पश्चाताप नाही. मला गांधींचा तिरस्कारच आहे, त्यांनी गोडसेंचे महात्मा म्हणून वर्णन करताना म्हटले की, मी गोडसेंना कोटी-कोटी नमस्कार करतो, त्यांना माझा साष्टांग प्रणाम आहे. WATCH Even after the FIR, Kalicharan Maharaj said, I have no remorse, even if I am hanged My salutation to Godse!


वृत्तसंस्था

रायपूर : रायपूरच्या धर्म संसदेत महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले महाराष्ट्रातील संत कालीचरण यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. गांधींविरुद्ध आक्षेपार्ह बोलल्याने माझ्यावर एफआयआर दाखल केली, त्याबद्दल मला पश्चाताप नाही. मला गांधींचा तिरस्कारच आहे, त्यांनी गोडसेंचे महात्मा म्हणून वर्णन करताना म्हटले की, मी गोडसेंना कोटी-कोटी नमस्कार करतो, त्यांना माझा साष्टांग प्रणाम आहे.

रायपूरच्या धर्मसंसदेत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर काँग्रेसने आक्रमक होत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कालीचरण यांनी आपली बाजू मांडणारा व्हिडिओ जारी केला. पुन्हा जवळपास त्याच गोष्टींची पुनरावृत्ती झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या व्हिडिओत कालीचरण अनेक गोष्टींबद्दल बोलताना दिसत आहेत.

कालीचरण म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू यांची फाशी गांधींनी थांबवली नाही. गांधींमुळेच सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर आज भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनू शकला असता. कालीचरण यांनी महात्मा गांधींवर घराणेशाहीचा पुरस्कार केल्याचा आरोप केला, भगतसिंग आणि राजगुरू यांची फाशी थांबवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, देशाचा कोणीही राष्ट्रपिता होऊ शकत नाही. राष्ट्रपिता बनवायचे असेल तर छत्रपती शिवाजी, राणा प्रताप, सरदार पटेल यांच्यासारखे लोक बनवले पाहिजेत, ज्यांनी राष्ट्रकुल एकत्र करण्याचे काम केले. देशाच्या फाळणीसाठी त्यांनी गांधींना जबाबदार धरले.

माझ्यासारखे कोट्यवधी कालीचरण मरायला तयार

रायपूर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रकरणावर कालीचरण म्हणाले की, मला सत्य बोलल्याबद्दल फाशीची शिक्षा दिली गेली तरी मी मृत्यू स्वीकारतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी जीव दिला तर माझ्यासारखा क्षुद्र प्राणी जगून काय करणार, माझ्यासारखे कोट्यवधी कालीचरण मरायला तयार आहेत.

WATCH Even after the FIR, Kalicharan Maharaj said, I have no remorse, even if I am hanged My salutation to Godse!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात