Yass Cyclone : विनाशकारी तौकते चक्रीवादळानंतर देशात आणखी एक चक्रीवादळ येणार आहे. यासंदर्भात हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने म्हटले की, येत्या 48 तासांत हवेचा दाब कमी होण्याची शक्यता आहे आणि यानंतर चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. या माहितीनंतर पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासनाबरोबर बैठका घे असून आवश्यक खरबदारीच्या सूचना देत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर अंदमान समुद्रात कमी हवेचा दाब तयार होत आहे. 22 मे रोजी हा दाब वेगाने वाढण्यास सुरुवात होईल आणि 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत हा एकतर बंगालच्या खाडीशी धडकेल किंवा ओडिशाच्या किनाऱ्याशी धडकू शकतो. हे चक्रीवादळ प्रत्यक्षात तयार झाल्यास या वर्षात बंगालच्या खाडीशी धडकणारे दुसरे चक्रीवादळ ठरेल. WATCH After Tauktae cyclone Now Yass Cyclone Alert In West Bengal and Odisha By Weather Dept
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App