Toolkit वर ट्विटरच्या भूमिकेवरून केंद्राने सुनावले, म्हटले- आमची चौकशी सुरू, एकतर्फी कारवाई करू नका!

Central Government Objects Twitter For Using Manipulated Media Tag For Tweets in Congress Toolkit issue

Congress Toolkit issue : टूलकिटप्रकरणी ट्विटरने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. सरकारने ट्विटरला म्हटले की, ट्विटरने मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग बंद करावा, कारण अद्याप टूलकिट प्रकरणाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय आयटी मंत्रालयाने म्हटले की, एजन्सची टूलकिटच्या कंटेंटची चौकशी करत आहे, ट्विटरची नाही. Central Government Objects Twitter For Using Manipulated Media Tag For Tweets in Congress Toolkit issue


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टूलकिटप्रकरणी ट्विटरने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. सरकारने ट्विटरला म्हटले की, ट्विटरने मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग बंद करावा, कारण अद्याप टूलकिट प्रकरणाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय आयटी मंत्रालयाने म्हटले की, एजन्सची टूलकिटच्या कंटेंटची चौकशी करत आहे, ट्विटरची नाही.

केंद्राने म्हटले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रक्रियेत तुम्ही हस्तक्षेप करू नका. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तोपर्यंत ट्विटर आपला निर्णय देऊ शकत नाही. किंबहुना ट्विटरने भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या काही ट्विटवर मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग दर्शवला आहे. हे ट्विट्स कॉंग्रेसच्या कथित टूलकिटविषयी करण्यात आले होते.

ट्विटरची पूर्वग्रहदूषित भूमिका

आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ट्विटर ग्लोबल टीमला भारतीय राजकारण्यांनी केलेल्या काही ट्वीटमध्ये मनिप्युलेटेड मीडियाचा टॅग वापरणे थांबवण्यासाठी लिहिले. याप्रकरणी संबंधित पक्षाने स्थानिक एजन्सीकडे तक्रार केली असून त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

एकीकडे सरकारी तपास यंत्रणांचा तपास सुरू असताना दुसरीकडे ट्विटरने मनिप्युलेटेड मीडियाचा टॅग वापरणे म्हणजे तपास पूर्ण होण्यापूर्वी एकतर्फी निर्णय दिल्यासारखे आहे. या प्रकारच्या टॅगिंगवरून असे दिसून येते की ट्विटर आधीच निर्णय घेत आहे, हे पूर्वग्रहदूषित आहे आणि तपासाला नवीन रंग देण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे.

काय आहे ट्विटरचे धोरण?

ट्विटरच्या धोरणानुसार, आपण ट्विट केलेल्या कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास, त्याचा स्रोत अचूक नाही आणि उपलब्ध माहितीही चुकीची असेल, तर त्यास मॅनिपुलेटेड मीडिया असे लेबल देण्यात येते. हे व्हिडिओ, ट्विट, फोटो किंवा इतर कोणत्याही कंटेंटवर टॅग केले जाते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक ट्वीटवर असे लेबल लावण्यात आले होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते नंतर निलंबित करण्यात आले.

Central Government Objects Twitter For Using Manipulated Media Tag For Tweets in Congress Toolkit issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात