
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असताना कुतुब मिनारचा वाध देखील कोर्टात आहे. या पार्श्वभूमीवर
दिल्लीच्या साकेत न्यायालयात सुनावणीपूर्वी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुरातत्व विभागाला (ASI) कुतुबमिनार संकुलाचे उत्खनन करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवालही मंत्रालयाने मागवला आहे. Vishnu pillar of Qutub Minar Union Ministry of Culture orders excavation and reporting
कुतुब मिनार आणि परिसरातील सर्वेक्षण करून मूर्तींचा तपशीलवार अहवाल तयार करा, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. 24 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कुतुबमिनारजवळ असलेल्या मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खनन केले जाऊ शकते. मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली. कुतुबमिनारमध्ये शेवटचे उत्खनन 1991 मध्ये झाले होते.
– कुतुब मिनार की विष्णू स्तंभ??
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत माजी ASI प्रादेशिक संचालक धर्मवीर शर्मा यांनी दावा केला आहे की कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला नव्हता. याबाबत त्यांनी 3 मोठे दावे केले होते. हा कुतुबमिनार नाही, सूर्य स्तंभ आहे. या संदर्भात माझ्याकडे बरेच पुरावे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शर्मा यांनी कुतुबमिनारचे अनेकवेळा सर्वेक्षण केले आहे.
– कुतुबमिनारचा बुरुज 25 इंच झुकलेला आहे, कारण येथून सूर्याचा अभ्यास केला जात होता. त्यामुळेच २१ जूनला सूर्य आकाशात जागा बदलत होता, तेव्हाही अर्धा तास त्या ठिकाणी कुतुबमिनारची सावली पडली नव्हती. हे विज्ञान तसेच पुरातत्वीय पुरावे आहेत.
– रात्री ध्रुव तारा पाहिला जात होता
शर्मा यांनी सांगितले की, लोकांचा दावा आहे की कुतुबमिनार ही एक स्वतंत्र इमारत आहे आणि ती जवळच्या मशिदीशी संबंधित नाही. वास्तविक, त्याचे दरवाजे उत्तराभिमुख आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी ध्रुव तारा दिसू शकतो.
दिल्लीच्या साकेत न्यायालयात, कुतुबमिनार संकुलातील पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. संयुक्त हिंदू आघाडीने 2022 मध्ये याचिका दाखल केली आहे.
कुतुबमिनार येथे असलेली कुव्वत-उल-इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची 27 मंदिरे पाडून बांधण्यात आली होती. अशा स्थितीत तेथे पुन्हा मूर्ती स्थापन करून पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी संयुक्त हिंदू आघाडीने याचिकेत केली आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Vishnu pillar of Qutub Minar Union Ministry of Culture orders excavation and reporting
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, पण महामंडळाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू; शरद पवारांचा शब्द!!
- पुण्यातल्या उद्याच्या राजसभेलाही 13 अटी!!; अयोध्या दौरा भोंगे यावर काय बोलणार??; प्रचंड उत्सुकता!!
- मनसे : संदीप देशपांडे, संतोष धुरींवरील गुन्हा तथ्यहीन; न्यायालयाची सरकारला चपराक!!
- पेट्रोल – डिझेल केंद्राकडून स्वस्त : पण महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या वेळी तरी प्रतिसाद देतील??