वृत्तसंस्था
कोची : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या संग्रहातील लेम्बोर्गिनी ही कार विक्रीस काढण्यात आली आहे. तुम्ही ही स्पोर्ट्स कार खरेदी करू इच्छित असाल तर ती तुम्हाला १.३५ कोटी मोजून खरेदी करता येईल. Virat Kohli’s ‘Lamborghini’ for sale; 1.35 crore will be charged for purchase
क्रिकेटपटू यांना अनेक प्रकारच्या आलिशान आणि महाग कार खरेदीचा शौक असतो. त्यांचे कार कलेक्शनसाठी अशा कारनी भरून असते. कोहलीकडे ही ‘भगव्या ‘ रंगाची लेम्बोर्गिनी गॅलार्डो स्पायडर कार आहे. आता ती कोचीच्या वापरलेल्या लक्झरी कार शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
एका ऑटोमोबाईल वेबसाईटनुसार कोहलीने २०१५ मध्ये ही लेम्बोर्गिनी विकत घेतली. काही काळानंतर त्याने ती विकली. पुद्दुचेरी येथे नोंदणी असलेली ही कार आता रॉयल ड्राइव्ह, कोचीमधील प्रीमियम आणि लक्झरी कार डीलर यांच्याकडे विक्रीसाठी ठेवली आहे. या कारची किंमत १.३५ कोटी रुपये आहे. रॉयल ड्राईव्हचे मार्केटिंग मॅनेजर म्हणाले, “हे २०१३ चे लँबोर्गिनी मॉडेल आहे. जे कोहलीने कमी वापरले आहे. केवळ १०,००० किमी एवढी कार धावली आहे.”
“आम्ही ही सेलिब्रिटी कार जानेवारी २०२१ मध्ये कोलकातास्थित प्रीमियम आणि लक्झरी प्री-गार्ड डीलरकडून खरेदी केली होती.” मॉडेलला LP560-4 असेही म्हटले जाते. जे ५.२ -लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड V10 इंजिनने युक्त आहे. जास्तीत जास्त 560 PS ची शक्ती निर्माण करते. ही कार ०-१०० किमी अंतर प्रति तास चार सेकंदात कापू शकते आणि इलेक्ट्रॉनिक मर्यादित टॉप स्पीड ३२४ किमी प्रति तास गाठू शकते, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App