विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचलेली धाकड गर्ल विनेश फोगट आता कोणत्याही पदाकासाठी खेळू शकणार नाही. तिचे वजन 100 ग्रॅम अधिक वाढ झाल्याने तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवले. त्यामुळे ऑलिम्पिकच्या स्पर्धेतून तिला बाहेर पडावे लागले. त्यामुळे संपूर्ण भारतात निराशा आणि संतापाचे वातावरण पसरले. यावरून फार मोठे राजकारण दिल्लीत रंगले. काँग्रेस सह विरोधकांनी सरकारला घेरले. हा षडयंत्राचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली. तिला जाणीवपूर्वक अपात्र ठरवले असल्याचा दावाही अनेकांनी सोशल मीडियावर केला. Vinesh Phogat olympic 2024 disqualify
मात्र या सर्व बाबींवर हिंदकेसर दीनानाथ सिंग यांनी वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकत ऑलिंपिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांची कठोरता सांगितली. विनेश फोगट अपात्र होणे हे देशाचे दुर्भाग्य आहे. कधीकधी असं असतं की आपली इच्छा असते पण देवाचीच इच्छा नसते. आज देशाचा गर्व होता, देशाची शान होती. ती लढणारी मुलगी आहे. पण वजनावर कंट्रोल ठेवता आला नाही. खेळाडूंना सवय असते की वजन कमी करून खालच्या वजनात लढायचं. पण वजन राखता आलं पाहिजे. वजन कमी करताय तर वजन राखलं पाहिजे. तोंडावर कंट्रोल केला पाहिजे. काहीतरी खाल्ले असेल, कारण पोटात काहीतरी गेल्याशिवाय वजन कधीच वाढत नाही, अशी खंत दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केली.
पाणी प्यायले अर्धा किलो वजन वाढते
एशियाडमध्ये शामराव साबळे याने त्याच्या आईने बनवलेला लाडू नेला होता. आईने लाडू दिला आहे म्हणून त्याने दोन लाडू खालले. पण त्यामुळे त्याचं शंभर ग्राम वजन वाढलं अन् तो अपात्र ठरला”, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वजन वाढलं तर तुम्ही लढू शकत नाही. वजनावर कंट्रोल ठवता आले पाहिजे. तुम्ही अर्धाग्लास पाणी प्यायलात तर अर्धा किलो वजन वाढते. उपवास करायची सवय नाही पैलवानांना, असेही ते म्हणाले.
Sanjay Nirupam : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची सडकून टीका
रात गई बात गई
विनेश फोगटला अपात्र करणं हा षडयंत्रचा भाग असल्याची टीका होत आहे. त्यावर दीनानाथ सिंग म्हणाले, षडयंत्र कसं होणार?? पॅरिसमध्ये भारताचा कोण शत्रू आहे?? जो नियम आहे, तो सर्वांना लागू आहे. नियमाचे पालन झालंच पाहिजे.” तसंच, अपात्र ठरल्यानंतर यातून पर्याय निघू शकतो का?? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी या पर्यायावर नाही असं उत्तर दिलं. “शक्य नाही. बात गई रात गई”, असं ते म्हणाले.
नियमांचा बऱ्याचवेळा पश्चाताप झालाय
आपली छोटीशी एक चूक किती त्रास देऊन गेली. वजन कमी केल्यानंतर जीभेवर कंट्रोल ठेवला पाहिजे. अंघोळसुद्धा करायची नसते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्वांनी तिची काळजी घ्यायला पाहिजे होती. देखरेख करायला पाहिजे होती. शौचास, मूत्रास गेल्यावरही दारापाशी उभं राहावं लागतं. तिथंही पाणी प्यायला देत नाहीत. या नियमाचा पश्चाताप बऱ्याचवेळा झाला.
देश का कोई दुश्मन हो सकता है क्या?
विनेश आधीपासूनच म्हणत होती की माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जाईल, याबाबत ते म्हणाले, “हे शक्य आहे का?? कोई देश का दुश्मन हो सकता है क्या?? तो जागतिक नियम आहे. हरल्यानंतर सर्व बोलतात. पण हे उचित नाही. आम्हीही परदेशात गेलो आहे. वजन कमी नाही केलं तर आऊट. आऊट केल्यानंतर कोणावर तरी आरोप करायचे.
विनेशने निश्चित गोल्ड मेडल आणलं असतं. जिगरबाज मुलगी आहे. ज्या आईने तिला जन्म दिला ती आई धन्य आहे. असे घडायला नको होतं, पण असे घडले आहे, असे उद्गार देखील त्यांनी पुढे काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more