मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, बघा नेमकं काय घडलं
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर अवघा देश दु:खात होता. कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाच्या खेळाडूंना तर अश्रू अनावर झाले होते. अशावेळी अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भारतीय खेळाडूंच्या ड्रेसिंगरुमध्ये गेले आणि त्यांनी खेळांडूचे सांत्वन करून धीर दिला. VIDEO Modi Shah go to Indian teams dressing room after World Cup defeat and see what happened next
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. मोहम्मद शमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारून सांत्वन केले. जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पंतप्रधानांच्या भेटीचा अनुभवही शेअर केला. त्याच वेळी, आता ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये पंतप्रधान सर्व खेळाडूंशी बोलत आहेत.
Prime Minister Narendra Modi meeting Indian team after the heart-breaking loss in the final. pic.twitter.com/3FTwR2Tzd2 — Johns. (@CricCrazyJohns) November 21, 2023
Prime Minister Narendra Modi meeting Indian team after the heart-breaking loss in the final. pic.twitter.com/3FTwR2Tzd2
— Johns. (@CricCrazyJohns) November 21, 2023
पंतप्रधान कोहली आणि रोहितला म्हणाले, ‘तुम्ही सगळे 10-10 सामने जिंकून परत आलात, हे होतच राहते, हसा भाऊ, देश तुम्हाला पाहत आहे. असे घडत असतं.” यानंतर, पंतप्रधानांनी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही संवाद साधला, “तुम्ही खूप मेहनत केली पण हे होतच असतं.” असं म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी जडेजा यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. पंतप्रधानांनी बुमराशी गुजरातीमध्ये संवाद साधला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App