वृत्तसंस्था
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या वंदे भारत एक्स्प्रेसमधून १२० विद्यार्थ्यांना शुक्रवारी मोफत सफर घडविण्यात येणार आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना देखील अशीच सफर घडविण्यात येणार आहे. Vande Bharat Express free travel from Mumbai today
केंद्रीय, राज्य आणि रेल्वे शाळांमध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. रेल्वेविषयी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्याने त्यांना मुंबई ते कल्याण असा प्रवास घडवला जाणार आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तब्बल 10000 व्हिडीओ बनवण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App