Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीची 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी तब्बल 51 उमेदवार

Vanchit Bahujan Aghadi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vanchit Bahujan Aghadi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी आघाडी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने 21 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.Vanchit Bahujan Aghadi

तृतीयपंथीय उमेदवाराला तिकीट

काही दिवसापूर्वी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यात वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. शमिभा या तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवार निश्चित झाले आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटापाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या देखील लवकरच उमेदवार ठरवून जागावाटप पूर्ण केले जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने तब्बल 51 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Vanchit Bahujan Aghadi 51 candidates for Assembly Elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात