विशेष प्रतिनिधी
मुंबई : वैशाली माडे ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. वैशाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते.काही दिवसापर्वीच वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता .पण वैशालीची एक पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ही पोस्ट शेअर करत वैशालीने तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे.VAISHALI MADE: ‘My assassination plot is being hatched’! Excitement with the shocking Facebook post of singer Vaishali Made …
वैशालीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. “माझ्या हत्येचा कट रचला जातोय. २ दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”, अशी पोस्ट वैशालीने केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून तिची काळजी सगळ्यांना लागली आहे.
तर, आता सगळ्यांसमोर प्रश्न आहे की अचानक असं काय झालं की वैशालीच्या हत्येचा कट रचला जात आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं
काही महिन्यांपूर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केले होते. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद देण्यात आलं आहे
वैशाली ही हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिग करते. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे गाणं तिने गायलं आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच तिनं ‘कलंक’ या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायलंय. यासोबत तिने मराठी चित्रपटातील अनेक गाणी गायली आहेत.
वैशाली ही ‘सारेगमप’ या स्पर्धेची विजेती ठरली होती. यासोबत वैशाली ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. वैशालीनं तिच्या गायनाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App