FARHAN WEDS SHIBANI : मराठमोळ्या पद्धतीने होणार फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं लग्न ; खंडाळ्यात रंगणार सोहळा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चला उडवून देऊ बार म्हणत आता शिबानी दांडेकर फरहान अख्तरसह लग्नगाठ बांधणार आहे .सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक प्रसिद्ध जोड्या विवाहबंधनात अडकत आहेत. चंदेरी दुनियेतील आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकत आहेत. फरहान आणि शिबानी शनिवारी लगीनगाठ बांधत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन रिती-रिवाजानुसार हा विवाह पार पडणार आहे.FARHAN WEDS SHIBANI

 

या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. फरहान अख्तरची आई हनी ईरानी यांनी ही माहिती दिली आहे.FARHAN WEDS SHIBANI

19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फरहानच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर सात फेरे घेत साताजन्माची गाठ बांधणार आहेत. फरहान आणि शिबानी गेल्या चार वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत.

 

लग्नाच्या आधीच्या रिती-रिवाजांना सुरुवात झाली असून गुरुवारी शिबानीच्या वांद्रे स्थित घरामध्ये मेहंदी सेरेमनी पार पडली. या सेरेमनीमध्ये जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी घरीच सर्व तयारी करण्यात आली होती. शबाना आझमी,अमृता अरोरा याही मेहंदी सेरमनी मध्ये सहभागी झाल्या होत्या.FARHAN WEDS SHIBANI

हा विवाह खासगी पद्धतीने पार पडणार आहे. मीडियाने विवाहाला उपस्थित राहून फोटो काढू नये म्हणून हा विवाहाबाबत अधिक माहिती देत नसल्याचे हनी ईरानी यांनी स्पष्ट केले.

लग्नासाठी आज फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय खंडाळ्याच्या फार्महाऊसवर विवाहस्थळी दाखल होतील. 19 फेब्रुवारी रोजी पारंपरिक विवाह पार पडल्यानंतर 21 फेब्रुवारी सिविल सेरेमनीमध्ये लग्न होईल.

फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला.

फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला.

 

FARHAN WEDS SHIBANI

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण