शिवजयंती मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे ‘एसएसपीएमएस’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.Shiv Jayanti procession canceled this year on the backdrop of Karona

दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये ऐतिहासिक स्वराज्यघराणी, सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या शंभर स्वराज्य रथांचा सहभाग असतो. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिरवणूक न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

दरवर्षीप्रमाणे शनिवारी (19 फेब्रुवारी) लालमहाल येथील माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर ‘जिजाऊ मॉंसाहेब, शहाजी महाराज शिवज्योत’ लालमहाल ते ‘एसएसपीएमएस’ संस्थेपर्यंत जाणार आहे. यासह सकाळी ११वाजता हेलिकॉप्टने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

Shiv Jayanti procession canceled this year on the backdrop of Karona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात