मजुरांना सुखरुप बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावरील (NH) एका बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याने 40 ते 45 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. कामगारांचे जीव वाचवण्यासाठी पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.Uttarkashi tunnel disaster 40 laborers trapped under the debris are being supplied with oxygen through a pipe
राज्य आपत्ती प्रतिसाद अधिकारी दुर्गेश राठोडी यांनी सांगितले की, ‘सुमारे 40 ते 45 मजूर आत अडकले आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.
वृत्तसंस्था एएफपीनुसार राठोड यांनी सांगितले की, अडकलेल्या कामगारांना ट्यूबद्वारे ऑक्सिजन पाठवला जात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची ग्वाहीही देण्यात आली आहे. यंत्रे सतत कचरा हटवत आहेत. रविवारी पहाटे चारच्या सुमारास साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा दीडशे मीटर लांबीचा भाग कोसळल्याने हा अपघात झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App