वृत्तसंस्था
लखनौ : कोरोना कायद्याअंतर्गत सामान्य जनतेवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, असे आदेश उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य गृहमंत्रालयाला दिले आहे Uttar Pradesh Chief Minister Yogi orders withdrawal of charges filed under Corona Act
मुख्यमंत्री म्हणाले, व्यापक जनहिताचा विचार करून हा आदेश काढला आहे. आता कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केले म्हणून दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची वेळ आली आहे. गृहमंत्रालाय आता याबाबत पावले उचलेल. यानंतर गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जिल्हास्तरावर पाठविले आहेत.
उत्तर प्रदेशात कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे विविध निर्बंध शिथील करण्याची प्रक्रियांना चालना मिळाली आहे. याबाबतच्या एका बैठकीत त्यांनी कोरोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर जिल्हापातळीवर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार फैलावतात. त्यामध्ये डासापासून होणाऱ्या डेंगू, डायरिया, कॉलरासह अन्य आजार होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता, सॅनिटाझेशन आणि फॉगिंग अभियान पावसाळा संपेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेशही त्यांनी काढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App