सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा सुव्यवस्थेवर सरकारचे मोठे काम, उत्तर प्रदेशची निवडणूक सहज जिंकणार असल्याचा योगी आदित्यनाथ यांचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

लखनऊ: सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारने मोठं काम केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी भाजप सहज जिंकेल. भाजप २०१७ च्या तुलनेत अधिक जागा जिंकेल. २०१७ मध्ये भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभानिवडणुकीत भाजप ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.Yogi Adityanath believes that the government’s great work on good governance, economic development and law and order will easily win the Uttar Pradesh elections

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ म्हणाले, सुशासन आणि सरकारने केलेली कामे आणि जातीय समीकरणांमुळे जनतेतील नकारात्मकतेवर मात करण्यात यश येईल. आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. गेल्या २३ वर्षांपासून आपण उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहोत. यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणं आपण जाणून आहोत. उत्तर प्रदेशातील मतदारांच्या राजकीय समज आणि परिपक्वतेवर आपल्याला विश्वास आहे.



उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा २६ सप्टेंबरला विस्तार झाला. यात ७ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळात सामाजिक समतोल आणि सर्व समाजांचे प्रतिनिधित्व असल्याचे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियन आणि राकेश टिकैत यांच्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पश्चिम युपीत पक्षाला निवडणुकीत बसणार नाही.

शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षांकडून निधी पुरवला जातोय. पण या आंदोलनाचा परिणाम हा ज्या राज्यांमध्ये दलाल आणि अडते आहेत, त्यांना बसणार आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी थेट सरकारच्या संपर्कात आहे. यामुळे सरकारची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून होत असून त्यांना त्यांना भरपाईही थेट मिळत आहे. विरोधकांकडे आता कुठलेही मुद्दे नाहीत. यामुळे विरोधक हे तथाकथित शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत,

भगवी वस्त्र घातली म्हणून योगीला धर्माच्या मयार्दा कशा काय घालू शकता? पूजाविधी करणं हा आपला अधिकार आहे. पण त्याचबरोबर आपला देश आणि समाजासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून मी हे काम करत आलो आहे. फरक इतकाच आहे की माझे कार्यक्षेत्र वाढले आहे. हे एक टीमवर्क आहे आणि मी स्वत:ला कधीच प्रोजेक्ट केले नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

Yogi Adityanath believes that the government’s great work on good governance, economic development and law and order will easily win the Uttar Pradesh elections

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात