मृत्यूनंतरच्या मुक्तीसाठी गंगा नदीत मृतदेह सोडण्याची आणि गंगेच्या तीरावर ते पुरण्याची काही शतकांची परंपरा आहे. मात्र भारताबद्दल आकस ठेवणाऱ्या पाश्चिमात्य मीडियाने याच्या नव्या-जुन्या बातम्या देऊन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या बदनामीच्या कारस्थानांकडे दुर्लक्ष करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा कोरोना विरोधातला लढा चालू ठेवला आहे. Uttar Pradesh chief minister Yogi Adityanath said that doctors in the state should be posted only on medical duty and not for administrative or management tasks.
वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच क्रांतीकारी निर्णय घेताना राज्याच्या सेवेतील डॉक्टरांना कारकुनी कामातून तसेच व्यवस्थापनातून बाजूला काढण्याचा आदेश दिला. त्यांचा जागा एमबीए तरुणांना द्या आणि डॉक्टरांना रुग्णसेवेचे त्यांचे मूळ कर्तव्य बजावू द्या, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालयीन कामातील व्यवस्थापनातील जागा अडवून बसलेल्या डॉक्टरांना पुन्हा मुळ रुग्णसेवेच्या कामाकडे वळावे लागणार आहे.
व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना एमबीए पदवीधारकांना व्यवस्थापन आणि प्रशासनातल्या कामांची संधी द्या, असे योगी आदित्यनाथ यांनी कोविड आढावा बैठकीत स्पष्ट केले. येत्या जुलै महिन्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग दुपटी-तिपटीने वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी लस टोचकांची जास्त गरज राज्याला भासेल असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
बुलंदशहर आणि बरेली या दोन शहरांमधली कोरोना संचारबंदी अंशतः कमी करण्याची घोषणा त्यांनी केली. या दोन्ही जिल्ह्यातली कोरोना रुग्णसंख्या सहाशेच्या आत आली आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेशातल्या निर्बंध हटवलेल्या जिल्ह्यांची संख्या थेट 67 झाली आहे. उत्तर प्रदेशात एकूण 75 जिल्हे आहेत. उत्तर प्रदेशातील रात्रीची आणि शनिवार-रविवारची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. योगी सरकारच्या ठाम निर्णयांमुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश आता टाळेबंदी मुक्तीकडे वेगाने वाटचाल करु लागले आहे.
राज्याच्या व्यवस्थापकीय कामाबद्दल योगी म्हणाले, “व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कामांमध्ये अडकून पडलेल्या डॉक्टरांना ताबडतोब यातून मुक्त करा. सरकारी रुग्णालये आणि कार्यालयांमधून खर्डेघाशी करणाऱ्या डॉक्टरांच्या जागी तरुण, एमबीए धारकांना संधी द्या.” लसीकरण मोहिमेबद्दल ते म्हणाले, “जुन महिन्यात एक कोटी उत्तर प्रदेश वासीयांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. जुलै महिन्यात हेच लक्ष्य दुपटीने-तिपटीने वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दृष्टीने नर्सिंग कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. ताबडतोब येत्या आठवड्यापासून त्यांचे प्रशिक्षण चालू करा.”
तब्बल 23 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात सध्या जेमतेम 19 हजार 438 सक्रीय कोरोना बाधित आहेत. उत्तर प्रदेशाचा रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतका देशात आघाडीवर आहे. गेल्या चोवीस तासात या राज्यात 1 हजार 92 नवे कोरोना बाधित आढळले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आत्तापर्यंत राज्यातल्या 1 कोटी 98 लाख जणांना कोरोना लस टोचली आहे. येत्या सोमवारपासून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू केली जातील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App