योगी मॉडेलने उत्तर प्रदेशात चमत्कार! कोरोनाच्या रुग्णांत ९३ टक्के घट, रिकव्हरी रेट ९७.१ टक्के,पाच कोटीवर नागरिकांच्या कोरोना चाचण्या


उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलने चमत्कार घडविला असून कोरोना रुग्णांच्या संख्येत ९७ टक्के घट झाली आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९३ टक्के झाला असून गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात केवळ दीड हजार नवे रुग्ण सापडले आहेत. पाच कोटीवर नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.Yogi model works wonders in Uttar Pradesh! Corona Patients Decline 93 Percent, Recovery Rate 97.1 Percent


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलने चमत्कार घडविला असून कोरोना रुग्णांच्या संख्येत ९७ टक्के घट झाली आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९३ टक्के झाला असून गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात केवळ दीड हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा उद्रेक होऊन सक्रीय रुग्णांची संख्या ३० लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच गंगा नदीमध्ये मृतदेह वाहत असल्याचा दुष्प्रचार करून राज्यात कोरोना वाढत असल्याचा आरोप केला जात होता.



परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आरोपांमुळे विचलित झाले नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर ट्रिपल टीचा (टेस्टींग- चाचणी, ट्रॅकींग – शोध आणि ट्रिटमेंट- उपचार) अवलंब करण्यात आला.

एका दिवसांत ३.३२ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. पाच कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करणारे उत्तर प्रदेश एकमेव राज्य बनले आहे. सध्या उत्तर प्रदेशात केवळ २८ हजार सक्रीय रुगण आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस (संघटन) बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर बी.एल. संतोष यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

की उत्तर प्रदेशात पाच आठवड्यांत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या ९३ टक्यांनी कमी झाली आहे. हे लक्षात घ्यायला हवे की उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटींपेक्षाही जास्त आहे.संतोष यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही टोला मारला आहे.

ते म्हणाले दीड कोटी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये कोरोनावर उपाययोजना करणे मुख्यमंत्र्यांना जमले नाही. योगी आदित्यनाथ यांनी प्रभावी पध्दतीने कोरोना महामारीवर उपाययोजना केल्या आहेत.

Yogi model works wonders in Uttar Pradesh! Corona Patients Decline 93 Percent, Recovery Rate 97.1 Percent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात