विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदी महासागरात चीनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. भविष्यात त्यांच्यापासून काही धोका होऊ नये यासाठी अमेरिका भारतीय नौदलाला मदत करणार आहे. भारतीय नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी ही मदत केली जाणार आहे.US to help India block Chinese movement in Indian Ocean
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ते दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये सध्या सक्रीय बदलली आहे. येथील सागरी सीमा ओलांडण्याचाही प्रयत्न अनेकदा होत आहे.
त्यामुळे अमेरिका भारताला त्याच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यात मदत करण्याबरोबरच देशाच्या संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भर होण्यासाठी पाठिंबा देणार आहे. भारताच्या सशस्त्र दलांना रशियन बनावटीची उपकरणे घेण्याची गरज पडणार नाही.
हिंद महासागर क्षेत्रातील वातावरण बदलत आह. चीनी नौदलाची सक्रीयता वाढली आहे. त्यामुळे भारताच्या क्षमतांना प्रोजेक्ट फोर्सेसचे बळ दिले जाणार आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App