MH 60R helicopters : भारत-अमेरिकेच्या संरक्षण भागीदारीला बळकटी देण्याचा आणखी एक अध्याय आता लिहिला गेला आहे. यानुसार अमेरिकन नौदलाने पहिले दोन एमएच -60 आर मल्टी-रोल हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाला सोपवली आहेत. भारतीय नौसेनेने लॉकहीड मार्टिन निर्मित ही 24 हेलिकॉप्टर अमेरिकन सरकारकडून परदेशी लष्करी विक्रीतून खरेदी केली आहेत. या हेलिकॉप्टरची अंदाजित किंमत 2.4 अब्ज डॉलर्स आहे. US Navy hands over MH 60R helicopters to India in Presence of Taranjit Singh Sandhu
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत-अमेरिकेच्या संरक्षण भागीदारीला बळकटी देण्याचा आणखी एक अध्याय आता लिहिला गेला आहे. यानुसार अमेरिकन नौदलाने पहिले दोन एमएच -60 आर मल्टी-रोल हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाला सोपवली आहेत. भारतीय नौसेनेने लॉकहीड मार्टिन निर्मित ही 24 हेलिकॉप्टर अमेरिकन सरकारकडून परदेशी लष्करी विक्रीतून खरेदी केली आहेत. या हेलिकॉप्टरची अंदाजित किंमत 2.4 अब्ज डॉलर्स आहे.
शुक्रवारी सॅन दिएगोच्या नेव्हल एअर स्टेशन नॉर्थ आयलंड किंवा एनएएस नॉर्थ आयलंड येथे शुक्रवारी झालेल्या समारंभात हेलिकॉप्टर अमेरिकन नौदलामार्फत औपचारिकपणे भारतीय नौदलाला देण्यात आले. अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांनी हजेरी लावली. संधू म्हणाले की, सर्व-हवामानातील मल्टी-रोल हेलिकॉप्टर्सचा ताफ्यात समावेश हा भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण संबंधातील महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतीय राजदूताने ट्विट केले की, भारत-अमेरिका मैत्री नवीन उंचीला स्पर्श करत आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संरक्षण व्यापार २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. संरक्षण व्यापाराव्यतिरिक्त, भारत आणि अमेरिका संरक्षण-क्षेत्राच्या सह-विकासावर एकत्र काम करत आहेत. अलीकडच्या काळात संरक्षण क्षेत्रात भारताने घेतलेल्या सुधारणांचा संदर्भ संधू यांनी दिला, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना नवीन संधी मिळाल्या आहेत.
एमएच -60 आर मल्टी रोल हेलिकॉप्टर हे सर्व हवामानातील नवीनतम तंत्रज्ञानासह एकापेक्षा जास्त मोहिमांमध्ये कामगिरी बजावण्यासाठी डिझाइन केलेले एक हेलिकॉप्टर आहे. या एमआरएचचा समावेश भारतीय नौदलाच्या थ्री डायमेन्शनल क्षमतांमध्ये वाढ करेल. हेलिकॉप्टरमध्ये अनेक खास उपकरणे आणि शस्त्रेदेखील असतील. भारतीय चालक दलाची पहिली तुकडी सध्या अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे.
संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, या प्रस्तावित विक्रीमुळे भारताची पृष्ठभागरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढेल. प्रादेशिक धोक्यांशी सामना करण्यासाठी आणि देशाचे संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी भारत या क्षमतांचा वापर करेल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भेटीच्या काही आठवड्यांपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये भारत सरकारने हेलिकॉप्टर खरेदीस मान्यता दिली होती.
US Navy hands over MH 60R helicopters to India in Presence of Taranjit Singh Sandhu
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App