विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : २०२० मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षांचा रिझल्ट जाहीर झाला आहे. एकूण उत्तीर्ण उमेदवार ७६१ असून, विद्यार्थिनींची संख्या २१६ तर विद्यार्थ्यांची संख्या ५४४ ईतकी आहे. पास झालेल्या पहिल्या २५ परिक्षार्थीमध्ये तेरा विद्यार्थिनी आणि बारा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
UPSC results declared, Shubham Shinde made his father proud with his success
महाराष्ट्रातील विद्यार्थी शुभम पांडुरंग जाधव या पंढरपूर मधील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील शेतकऱ्याच्या मुलाने या यादीत ४४५ वे स्थान मिळवले आहे. शुभमने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शिंदेवाडी येथील शाळेत घेतले व माध्यमिक शिक्षण माळीनगर येथे पूर्ण केले. इकॉनॉमिक्स विषय घेऊन त्याने बी.ए. ची पदवी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतली. यूपीएससीच्या परीक्षेची तयारी त्याने ज्ञानप्रबोधिनी आणि युनिक क्लासेस मधून केली. सलग चार वेळा मुलाखतीमधे शुभमला अपयश आले. परंतु अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवून त्याने अभ्यास चालू ठेवला आणि यावेळी त्याने नेत्रदीपक यश मिळवत देशामध्ये ४४५ वे स्थान मिळविले. वडिलांचे स्वप्न त्याने जिद्दीने पूर्ण केले आहे. शुभम मागास प्रवर्गातील असल्यामुळे त्याला आय.पी.एस मिळण्याची शक्यता आहे. पण शुभमची जिद्द पुढील वर्षी अजून जोमाने अभ्यास करून आहे आयएएस होण्याची आहे.
UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल
सागर भारत मिसाळ या वाघोली येथील शेतकऱ्याच्या मुलाने या यादीत ३५४ वा नंबर मिळवून यश संपादन केले आहे. २०२० मध्ये सागर मिसाळ याची उत्तराखंड राज्यात आयएस पदावर निवड झाली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या यादीत त्याचा क्रमांक २०४ वा होता. या दोघांचेही जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सदर परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. कोरोनामुळे मुलाखती घेण्यास उशीर झाला होता. फेब्रुवारी ते जुलै महिन्यात लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ७६१ उमेदवारांची लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांवर कामासाठी नियुक्तीची शिफारस केलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App