UP Assembly Election : उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…


निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूपीमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी तारखा जाहीर केल्या. 10 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबत विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत.UP Assembly Election Polling will be held in seven phases in Uttar Pradesh from February 10 to March 7, read more …


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूपीमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी तारखा जाहीर केल्या. 10 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबत विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत.मतदानाच्या तारखा

पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा – 27 फेब्रुवारी
सहावा टप्पा – 3 मार्च
सातवा टप्पा – 7 मार्च

उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ कधी संपणार

यूपीमध्ये सध्या भाजपचे योगी सरकार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत यूपी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया 14 मेपूर्वी पूर्ण करावी लागेल. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत.

यापूर्वी, यूपीमध्ये विधानसभा निवडणूक फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये झाली होती. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 325 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च 2017 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यूपीमध्ये पाच वर्षे पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

यूपीच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष

यूपीमध्ये प्रामुख्याने भाजप, सपा, बसपा, काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. अनेक प्रादेशिक पक्षही सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांची स्पर्धा वाढली आहे. मात्र, यावेळी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षासाठी सोपी नसल्याचं सांगण्यात येत आहे.

2017 मध्ये काय होता निकाल?

यूपीमध्ये एकूण जागा – 403, बहुमताचा आकडा – 202

भाजप- 325
सपा- 47
बसपा-19
काँग्रेस – 7
इतर- 5

UP Assembly Election Polling will be held in seven phases in Uttar Pradesh from February 10 to March 7, read more …

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*