कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झाली हाणामारी, १ कैद्याचा मृत्यू ; ६ कैद्यांवर गुन्हा दाखल


कारागृहात झालेल्या या खुनामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले असून, पोलिसांकडून या खुनाचा तपास सुरू आहे.Inmates clash at Kalamba Central Jail, 1 inmate killed; Crimes filed against 6 prisoners


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक खळबळजनक घटना घडली आहे.कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली.दरम्यान या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला आहे.निशिकांत बाबूराव कांबळे (वय 47, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत कैद्याचे नाव आहे.याप्रकरणी कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारागृहात झालेल्या या खुनामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले असून, पोलिसांकडून या खुनाचा तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय घडली?

कैदी शिवाजी कांबळे आणि कैदी निशिकांत कांबळे यांच्यात गुरुवारी सायंकाळी किरकोळ शिवीगाळ व वादावाद झाला. दरम्यान निशिकांतने पाण्याच्या नळाजवळील फरशी उखडून शिवाजी कांबळेच्या दिशेने भिरकावली.पुढे या दोघांमध्ये पुन्हा हाणामारी झाली.यावेळी जखमी शिवाजी कांबळेने कारागृहातील अन्य साथीदारांना बोलाविले.



त्यानंतर शिवाजी कांबळेसह सहा कैद्यांनी निशिकांतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यात त्याचा रक्तदाब कमी झाला.दरम्यान त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे

सचिन राजाराम ढोरे-पाटील (वय 35), अक्षय तुकाराम काळभोर (वय 30, दोघे रा. पुणे), इलियास मुसा मुल्ला (वय 35, रा. सांगली), बबलू संजय जावीर (वय 32, रा. कोल्हापूर), किरण ऊर्फ करण प्रकाश सूर्यवंशी (वय 38, रा. खानापूर, जि. सांगली) आणि शिवाजी तिपन्ना कांबळे (वय 40, रा. कोल्हापूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Inmates clash at Kalamba Central Jail, 1 inmate killed; Crimes filed against 6 prisoners

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात