KARUNA MUNDE-DHANANJAY MUNDE : करुणा मुंडे म्हणाल्या – धनंजय मुंडे यांचा आमच्या नवीन पक्षाला पाठिंबा…


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर :  धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी अहमदनगर येथे शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली होती. या पक्षाच्या प्रसारासाठी करुणा मुंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे. मी काही करु शकणार नाही असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचा आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा व अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला. Karuna Munde said, Dhananjay Munde supports our new party …

एक अदृष्य शक्ती आपल्याकडून हे कार्य करवून घेत असून, महिला व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. संगमनेरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळातील वाटचाल या बाबत त्यांनी संवाद साधला. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या वेळी पक्षाचे कोषाध्यक्ष भारत भोसले उपस्थित होते.

करुणा मुंडे म्हणाल्या की, पंचवीस वर्षे धनंजय मुंडे यांच्यासोबत संसार करीत आहे. दोन मुलांचे संगोपनही व्यवस्थित केले आहे, मात्र मागील काही दिवसांत आपल्यावर प्रचंड अन्याय झाल्याच्या भावनेतून, संघर्षासाठी नवीन पक्षाची स्थापना केली आहे.



आपल्यावर न्यायालयाने घातलेली बंधने शिथिल झाल्यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत पतीच्या अनेक खळबळजनक कृत्यांचे रहस्य उघड करणार असल्याचे करुणा धनंजय मुंडे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या वैवाहिक जीवनात राजकारणातील प्रचंड आर्थिक व इतर घडामोडी अनुभवल्या आहेत. त्यातून बरेच काही शिकता आले. त्या पाठबळावर महिला व तृतीयपंथीयांसह निस्वार्थी व कळकळीच्या समाजसेवी वृत्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून, राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याचा मानस आहे.

सध्याच्या राजकारणातील नेत्यांनी नैतिकता सोडली आहे. प्रचंड पैसा आणि स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करुन, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणारी ही प्रवृत्ती दूर करण्याची आवश्यकता आहे. वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभुत समस्या सुटल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बीड सारख्या भागात अद्यापही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे. स्वपक्षातील संजय राठोड या आमदारावर गुन्हा दाखल झाला तरच, ठाकरे सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होवून पूजा चव्हाणला न्याय मिळेल. खोटे गुन्हे, तुरुंगवास व अत्याचाराचा आपणही सामना केला असून, एका मंत्र्याच्या पत्नीची ही अवस्था तर सर्व सामान्याना कसा न्याय मिळेल असा सवाल त्यांनी केला.

Karuna Munde said, Dhananjay Munde supports our new party …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात