सर्व केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये जाऊन वैद्यकीय सुविधांचा आढावा घ्यावा असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. राज्यांची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे. याबाबत कोणत्याही राज्याशी दुजाभाव केला जात नाही, असेही त्यांनी सांगितले.Union ministers should visit the hospital , Modi government’s instructions
विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : सर्व केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये जाऊन वैद्यकीय सुविधांचा आढावा घ्यावा असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली.
राज्यांची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे. याबाबत कोणत्याही राज्याशी दुजाभाव केला जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
रेड्डी यांनी हैद्राबाद येथील गांधी हॉस्पीटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व केंद्रीय मंत्री देशभरातील रुग्णालयांना भेट देत आहेत. याठिकाणी कोरोनावरील उपचारांचा आढावा ते घेणार आहे. मी देखील गांधी हॉस्पीटल आणि किंग कोटी हॉस्पीटलला भेट देऊन आढावा घेतला.
केंद्र सरकार हवेतून ऑक्सिजन गोळा करण्याचे दोन युनीट पोहोचवित आहे. त्यांची क्षमता दर मिनिटाला दोन हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्याची आहे. या पध्दतीचे युनीट हॉस्पीटलना पुरविले जाणार आहेत.
रेमडेसिवीर आणि कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याबाबत रेडी म्हणाले, हे निर्मिती प्रकल्प अहोरात्र चालू आहेत. तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. लष्कराच्या विमानांनीही गरज असलेल्या भागात ऑक्सिजन पाठविला जात आहे.
राज्यांची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे. याबाबत कोणत्याही राज्याशी दुजाभाव केला जात नाही. लोकांनी पुढे येऊन कोरोनाच्या विरुध्द लढ्यात योगदान द्यावे. अगदी किरकोळ लक्षणे दिसली तरी कोरोना चाचणी करून घ्यावी.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App