विशेष प्रतिनिधी
पाटणा : केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री पशुपतीकुमार पारस यांना मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारस यांनी पार्लमेंट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.Union Minister Pashupati Kumar Paras receives death threats, writes letters to Amit Shah and Nitish Kumar demanding increased security
पारस यांनी सांगितले की एका अज्ञशत व्यक्तीने त्यांना मोबाईलवर फोन केला. जीवे मारण्याची धमकी दिली. कोण बोलतेय हे विचारल्यावर शिवीगाळ केली.पारस म्हणाले मी लोकजनशक्ती पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षाचा विस्तार संपूर्ण देशात करत आहे. त्यामुळे विरोधक माझ्यावर चिडलेले आहेत.
काही दिवसांपूर्वी हाजीपूर या आपल्या मतदारसंघात गेलो असताना काही जण माझ्याशी अभद्रपणे वागले होते. त्यांनी अंगावर ऑईल फेकण्याचाही प्रयत्न केला होता. हे कोण लोक होते आणि त्यांना रोखण्यात पोलीस अपयशी कसे ठरले याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे केली आहे.
या सगळ्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगून पारस म्हणाले, काही जण मला त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी घाबरणार नाही. माझे संपूर्ण राजकीय जीवन हे इमानदार आणि पारदर्शक राहिले आहे. गेल्याच आठवड्यात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रधान महासचिव केशव प्रसाद सिंह यांनाही फोनवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
त्याबाबत पोलीसांत तक्रार दिली आहे. मला आणि माझ्य पक्षाच्या लोकांना फोनवरून धमकी देणारे कोण आहेत याची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.पशुपती पारस हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू आहेत.
आपले पुतणे चिराग पासवान यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी पक्षाच्या सर्वच्या सर्व पाच खासदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर चिराग पासवान यांनाच पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविले होते. लोकजनशक्ती पक्ष आता भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग बनला असून पारस यांना नुकतेच केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App