”आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु …” ; मांडविया यांचे उच्चस्तरीय आढावा बैठकीत विधान!

Union Health Minister Mansukh Mandaviya
  • भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत असल्याने सरकार अलर्ट मोडवर आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत आहे. कोरोना JN.1 च्या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाची वाढती प्रकरणे आणि श्वसनाच्या आजाराने ग्रस्त लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.Union Health Minister Mansukh Mandaviya take a high level review meeting due to the increasing number of corona infections

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाचे व्यक्ती या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी आरोग्य सुविधा आणि सज्जता तसेच संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.



ICMR संचालक डॉ. राजीव बहल, NITI आयोगाचे सदस्य डॉ. VK पॉल आणि ICMR माजी महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही या बैठकीत भाग घेतला होता.

कोविड-19 वरील आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, ‘हीच वेळ आहे एकमेकांसोबत काम करण्याची. संपूर्ण सरकारी दृष्टीकोनातून एकत्र काम करण्याचीही ही वेळ आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु घाबरण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, रुग्णालयाची तयारी, वाढलेली देखरेख आणि लोकांशी प्रभावी संवादाचे मॉक ड्रिलसह तयार राहणे महत्त्वाचे आहे. सर्व रुग्णालयांमध्ये दर तीन महिन्यांनी एकदा मॉक ड्रील घेण्यात याव्यात. ते म्हणाले, ‘मी राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देतो. आरोग्य हे राजकारणाचे क्षेत्र नाही.

Union Health Minister Mansukh Mandaviya take a high level review meeting due to the increasing number of corona infections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात