विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात मध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातला प्रचार संपत असताना काँग्रेस आपल्या मूळ भूमिकेवरच आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करायचे नाही असा “पण” केलेल्या काँग्रेस नेत्यांना अखेर मोदींनाच घेरणे भाग पडले आणि त्यांचा प्रचार पुन्हा एकदा घसरला. 2007 मध्ये मौत के सौदागर, 2017 मध्ये नीच, आणि 2022 मध्ये रावण असा काँग्रेसचा गुजरात मधला घसरता प्रचार प्रवास आहे. Unable to take the heat of Gujarat election, pushed to the fringe, Congress national president Mallikarjun Kharge
2007 मध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये काँग्रेसच्या जाहीर सभेत त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मौत के सौदागर म्हटले होते. तिथून निवडणुकीचे वारे फिरले आणि मोदींच्या पारड्यात बहुमत पडले. 2012 मध्ये त्याचे रिपीटेशन झाले. पण 2017 मध्ये भाजप आणि काँग्रेस तुल्यबळ असताना मणिशंकर अय्यर मोदींना नीच म्हणाले आणि निवडणुकीचे पारडे फिरले. भाजप 2017 मध्ये शंभरीच्या आत 99 वर थांबली, पण काँग्रेस मात्र घसरून 77 वर उरली.
Unable to take the heat of Gujarat election, pushed to the fringe, Congress national president Mallikarjun Kharge loses control over his words, calls Prime Minister Narendra Modi “Ravan”. From “Maut ka Saudagar” to “Ravan”, Congress continues to insult Gujarat and it’s son… pic.twitter.com/je5lkU4HBw — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) November 29, 2022
Unable to take the heat of Gujarat election, pushed to the fringe, Congress national president Mallikarjun Kharge loses control over his words, calls Prime Minister Narendra Modi “Ravan”.
From “Maut ka Saudagar” to “Ravan”, Congress continues to insult Gujarat and it’s son… pic.twitter.com/je5lkU4HBw
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) November 29, 2022
आज 29 नोव्हेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे प्रचाराच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण म्हणाले. मोदी किती दिवस स्वतःच्या चेहऱ्यावर मते मागणार??, प्रत्येक राज्यात जाऊन ते स्वतःच्या चेहऱ्यावरच मते मागतात. आम्ही किती दिवस त्यांचा चेहरा बघायचा??, त्यांना रावणासारखी दहा तोंडे आहेत का??, असे टीकास्त्र मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या प्रचार सभेत सोडले.
ही टीका आता भाजपने उचलली आहे. भाजपने काँग्रेसवर जबरदस्त प्रहार केला आहे. मोदींना रावण म्हणण्यामागे काँग्रेसची खरी मानसिकता दिसते. राहुल गांधी जरी मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांची दर्शने घेत असले तरी त्यांच्या मनात राम नाही, तर रावणच आहे हेच दिसून आले, असे टीकास्त्र भाजपच्या नेत्यांनी सोडले आहे. सगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना रावण म्हणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर भाजप समर्थक आणि सर्वसामान्य नागरिक तीव्र विरोधाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रावण टीकेच्या निमित्ताने काँग्रेसचा 2007 ते 2022 एवढा दीर्घ प्रचाराचा घसरता आलेख मात्र कायम राहिला आहे. मौत के सौदागर पासून सुरू झालेला काँग्रेसचा प्रचार नीच शब्दामार्फत रावण शब्दापर्यंत येऊन पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App